शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

गुवाहाटीतून सूत्रे हलवली, शंभुराजेंनी साताऱ्यात बाजी मारली; शिंदे गटात आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:44 PM

राज्यात शिवसेनेतील बंडामुळे राजकीय उलथापालती सुरू आहेत. एकनाथ शिंदेसह ४० हून जास्त आमदार गुवाहाटीत तळ ठोकून आहेत.

प्रमोद सुकरे

कराड - पाटणचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली मरळी (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी अंतिम दिवशी शुक्रवारी (दि. 25) फक्त शंभूराज देसाई समर्थकांचेच अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोधच झाली. फक्त त्याची घोषणा बाकी आहे. पण याचे सेलिब्रेशन चक्क गुवाहाटीत करण्यात आले. तेथे असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर गट नेते एकनाथ शिंदेंसह अन्य आमदारांनी शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

राज्यात शिवसेनेतील बंडामुळे राजकीय उलथापालती सुरू आहेत. एकनाथ शिंदेसह ४० हून जास्त आमदार गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. मात्र तोवर पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र आसामच्या राजधानीत असलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी तेथूनच सर्व काही हालचाली केल्या. विरोधकांनी अर्जच दाखल न केल्याने  निवडणुकीत बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे, यासाठी बंड केलेल्या शिवसेना आमदारांनी गुवाहाटीत तळ ठोकला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पहिल्या दिवसांपासून त्यांच्या समवेत आहेत. कारखाना निवडणुकीच्या प्रक्रियेवर त्यांचे तेथून लक्ष होते. शुक्रवारी सायंकाळी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.या यशाबद्दल बंडखोर आमदारांनी शंभूराज देसाईंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याचे फोटो देखील पाटणमधील समर्थकांनी व्हायरल केले आहेत.

देसाईंच्या गोटात दुहेरी यशाचा जल्लोषगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कारखान्याच्या निवडणुकीची अगोदरच रणनिती आखली होती. उमेदवार निश्चित केले होते. स्वत:चा उमेदवारी अर्ज घेऊन भरून ठेवला होता. सूचक, अनुमोदकामार्फत तो भरला होता. तसेच विरोधी पाटणकर गट विरोधात पॅनेल टाकणार नसल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकताच बाकी होती. ही संधी साधून त्यांनी आपला मुलगा यशराज याचे लाँचिंग केले. अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे तरूण चेहर्‍याची सहकारात एन्ट्री आणि बिनविरोध निवडणूक, असा दुहेरी यशाचा जल्लोष शंभूराज देसाईंच्या गोटात साजरा होत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदे