नागपुरात बाजारपेठा बंद, रस्त्यांवर वर्दळ; तर औरंगाबादेतही डायनिंग सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:49 AM2021-03-16T07:49:31+5:302021-03-16T07:50:44+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही भरून घेण्यात येत आहे. 

Markets closed in Nagpur, streets crowded | नागपुरात बाजारपेठा बंद, रस्त्यांवर वर्दळ; तर औरंगाबादेतही डायनिंग सेवा बंद

नागपुरात बाजारपेठा बंद, रस्त्यांवर वर्दळ; तर औरंगाबादेतही डायनिंग सेवा बंद

googlenewsNext

नागपूर: नागपुरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून लावलेला आठवडाभराचा लॉकडाऊन अनेक गोष्टींनी वेगळा आहे. यावेळी अनेक गोष्टीमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था आदी सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असल्या तरी अनेक गोष्टी सुरु असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. तसेच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मही भरून घेण्यात येत आहे. 

धुळ्यातही दुकाने बंद; जनता मात्र रस्त्यावर
- धुळे जिल्ह्यात जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी शहरात मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. पण जनता मात्र रस्त्यावर फिरताना दिसून आली. दुकाने, बाजारपेठ बंद असताना जनता कशासाठी बाहेर आली हा प्रश्नच आहे. 
- शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. सायंकाळी शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली. जनता कर्फ्यू आहे की नाही, अशी परिस्थिती होती.

औरंगाबादेत डायनिंग सेवा बंद
औरंगाबाद
: जिल्ह्यात सध्या अंशत: लॉकडाऊन सुरू असून, या काळात हॉटेल्स, परमीट रुम्समध्ये नियमापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यामुळे १७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत हॉटेल्समधील डायनिंग सेवा बंद ठेवून, पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांवरच गदा कशासाठी,  त्याच्या रोजगाराचे काय, असा सवाल परमीट रुमचालकांनी केला आहे. 
 

Web Title: Markets closed in Nagpur, streets crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.