शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मराठवाडा, विदर्भ दुष्काळाच्या उंबरठयावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 2:28 PM

उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पण याच पावसाने महाराष्ट्रात पाठ फिरवली आहे.

ठळक मुद्देऑगस्टचा पंधरावडा संपला तरी, पावसाच्या सरी बरसत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.मराठवाडयातही मागच्या काही दिवसात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.

मुंबई, दि. 18 - उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पण याच पावसाने महाराष्ट्रात पाठ फिरवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठयावर आहेत. ऑगस्टचा पंधरावडा संपला तरी, पावसाच्या सरी बरसत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील पावसावर बळीराजाचे वर्षभरातील शेतीचे गणित अवलंबून असते.

पण यंदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एबीपी माझा वाहिनीने हे वृत्त दिले आहे. मराठवाडयातही मागच्या काही दिवसात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. येणा-या दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला नाही तर, या भागात भीषण दुष्काळी परिस्थिती उदभवू शकते. दोनवर्षांपूर्वी मराठवाडयाने अशा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना केला होता. 

आणखी वाचा चिंता नको; पाऊस गाठणार सरासरी  यंदा ४५ टक्के पाऊस कमी

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, लातूर विभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन-चार दिवस पाऊस न आल्यास पिके धोक्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

राज्यात ८ आॅगस्टअखेर ७०४ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत ५२७ मिलिमीटर पाऊस झाला. औरंगाबाद आणि लातूर विभागातील बहुतांश भागात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव तालुक्यात, तर बीड जिल्ह्यातील आष्टी, माजलगाव, अंबेजोगाईमधील पिकांची वाढ खुंटली आहे. हीच स्थिती जालनातही आहे.दुष्काळ जाहीर करामराठवाड्यात गेल्या दीड महिन्यात पावसाचा थेंब पडलेला नाही. खरीप पिके संकटात आहेत. दररोज दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुण मुले आणि मुलींमध्येही आत्महत्येचे लोण पसरले असतानाही राज्यकर्ते हातावर हात ठेवून बसले आहेत, याकडे लक्ष वेधत मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.लातूर विभागातील ४८ तालुक्यांपैकी १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, तर २२ तालुक्यांत ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. येथील २७.१५ लाख हेक्टरवर (१०० टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, नांदेड जिल्ह्यासह देगलूर व हिमायतनगर, परभणीतील गंगाखेड, पाथरी, पालम, जिंतूर व पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनूरी तालुक्यातील पिके सुकू लागली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी