शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

मराठवाड्याला महापुराचा फटका; महाराष्ट्राला महागाईचा ‘चटका’ 

By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2025 09:03 IST

सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राजाराम लोंढेलोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

साेलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत खरीप हंगामात मका, सोयाबीन, उडीद, तूर, मूग ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. पुरामुळे शेतकऱ्यांचा हंगाम पाण्यात गेला आहेच, त्याचबरोबर उत्पादन कमी होऊन  तेलबिया व कडधान्याचा तुटवडा  जाणवणार असून  त्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसणार आहेत.

‘ऐश्वर्या कोलम’ही कडाडणारविदर्भातील पिकांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गडचिरोलीमध्ये भाताचे ‘ऐश्वर्या कोलम’ वाण मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोल्हापुरात या तांदळाला ग्राहकांची पसंती जास्त असल्याने आगामी काळात तो कडाडण्याची शक्यता व्यापारीवर्गातून वर्तवली जात आहे.

मराठवाडा, सोलापूरमधील खरीप पिकांचे नुकसान पाहता त्याचा कडधान्यांसह खाद्यतेलाच्या दरावर भविष्यात परिणाम होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भात पिकाला फटका बसल्याने तांदळाचे दरही वाढू शकतात.सदानंद कोरगावकर, कडधान्य व्यापारी, कोल्हापूर.

जिल्हानिहाय खरिपातील पीक क्षेत्र, हेक्टरजिल्हा         मका          सोयाबीन       तूर            उडीद      मूगसोलापूर      ५३,७६४    ९१,४४८        ९९,०००    ८०,५१७    ९३०धाराशिव     ६,५२३       ४,५९,९४३    ३१,०३६    २५,६८३    ५,२७७लातूर          २,२०१        ४,९२,१४४    ६३,८९५    २९,००८    ४,५८१

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada floods impact; Maharashtra faces inflation's sting on food prices.

Web Summary : Floods in Marathwada destroy crops, potentially spiking prices of pulses, edible oil, and rice ('Aishwarya Kolam'). Solapur, Latur, and Dharashiv districts are heavily impacted, leading to anticipated shortages and market volatility.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाfloodपूरRainपाऊस