शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Marathi Sahitya Sammelan: कूस बदलायची वेळ..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:29 IST

Marathi Sahitya Sammelan: ​​​​​​​जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. 

- दीपक करंजीकर(अभिनेता व अर्थतज्ज्ञ) उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर, यंत्रभूमी, मंत्रभूमी, तंत्रभूमी अशी वर्षानुवर्ष ओळख असलेल्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. कुसुमाग्रज नगरी असे संमेलन स्थळाला नाव देण्यात आले आहे. संमेलन ज्या टाईमलाईनवर होत आहे तो फार महत्त्वाचा आहे. जगण्याचे सर्व आयाम जेथे उपभोगता येतात अशी शहरे देशात बोटावर मोजण्याइतकीच आहे. आणि त्यात नाशिकचा समावेश होतो. अशा शहरात मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने साहित्य संमेलनाने ९४ व्या वर्षी आपली कूस बदलण्याची गरज आहे. नवीन शतकातील २० वर्ष उलटून गेली आहेत. या वर्षात तंत्रज्ञानाचा जो वेग बघितला तर, तो त्याआधीच्या पन्नास वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. इतके झपाट्याने सर्व बदलत आहे. साहित्य हे समाज मनाचे प्रतिबिंब असते. खरं तर, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अशा परिस्थितीत वैज्ञानिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभतो, ही फार मोठी गोष्ट आहे. कूस बदलायची म्हणजे काय करायचे. तर, त्याला अनेक आयाम आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय केले. तर, आपली जीवनशैली, विचार पद्धती, संवाद पद्धती बदलली. काही भागात आपलं अवलंबित्व वाढवलं तर, काही भागात कमी केले. विज्ञानाने आपल्याला जिज्ञासू वृत्ती दिली. या जगातील प्रत्येक गोष्ट शास्त्र काट्याच्या कसोटीवर ताणून पाहायची असते आणि ती वारंवार घडत असेल तर, ते वैज्ञानिक सत्य मानायचे असते, असा दृष्टिकोन विज्ञानाने दिला.  नाशिकमधील साहित्यिकांनी अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्यासोबत बैठक घेऊन काही लोकांना विज्ञान कथेचा वारसा कसा सोपवता येईल यावर विचार करायला हवा.  विज्ञानातील काही शोध हे एखाद्या कल्पितापेक्षाही अद्भूत असू शकतात. याची ओळख करून देणारे अनेक लेखक मराठीत आहेत. पण कुतूहलाचे विषय वेगळे असतील अशा तरुणांनी त्यांच्यापेक्षा तरुण असलेल्या पिढीकरिता विज्ञानाची महती पोहोचवणाऱ्या कथा लिहिण्याकरिता काही येईल का, याचा विचार व्हावा.        

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक