शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

यूपीएससीमध्ये मराठी मुलांचा झेंडा

By admin | Updated: June 1, 2017 02:28 IST

यूपीएससी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील मुलांची घौडदौड कायम राहिली असून यंदाही एकूण १०९९ उत्तीर्ण उमेदवारांमध्ये १०० पेक्षा

पुणे : यूपीएससी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील मुलांची घौडदौड कायम राहिली असून यंदाही एकूण १०९९ उत्तीर्ण उमेदवारांमध्ये १०० पेक्षा जास्त मराठी मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये पुण्यातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांची संख्या ४५ ते ५० इतकी आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. त्यामुळे पुण्यातून तयारी करून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. विश्वांजली मुरलीधर गायकवाड (११), प्रभाश कुमार (३०), स्वप्निल खरे (४३), स्वप्निल रविंद्र पाटील (५५), नायर प्रजित प्रभाश कुमार (८७), भाग्यश्री दिलीप विसपुते (१०३), दिनेश गुरव (१६०), प्रांजल लहेनसिंग पाटील (१२४), सुरज अनंता जाधव (१५१), स्नेहल सुधाकर लोखंडे (१८४), अनुज मिलिंद तारे (१८९), ऐश्वर्या डोंगरे (१९६), विदेह खरे (२०५), राहुल नामदेव धोटे (२०९), अंकिता धाकरे (२११), योगेश भारसट (२१५), किरण खरे (२२१), अभिषेक कुमार प्रभाश कुमार (२३०), आदित्य रत्नपारखी (२५७), प्रविण इंगवले (२६७), परिक्षित झाडे (२८०), सौरभ सोनवणे (२९३), रघुवेंद्र चांबोळकर (३२१), वसंत हरिलाल राजपूत (३२६) आशिष पाटील (३३०) अमरेश्वर पाटील (३७६), मृणाल मिश्रा (३८०), कुलदीप सोनवणे (३८४), मुकूल कुलकर्णी (३९४), कपील गाडे (४०१), विनोद पाटील (४०२), संस्कृती पराशर (४०५), अजिंक्य काटकर (४११), महेश चौधरी (४२३),कार्तिक चेबोली (४५७), किशोरी रेडडी पोलू(४६८), जयदीप प्रदक्षिणे (४८२), संतोष सुखदवे (५४६), रोहन अगवणे (५८२), गोरख भामरे (५९०), महेश अनंतगिरी (६२३), प्रवीण डोंगरे (६४४), वैष्णवी बनकर (६५१) मिलिंद जगताप (६७१), नितीन भाकटे (६७३), सचिन मोटे (६९०), किशोर धस (७००), माधव वणवे (७०१), रोहन घुगे (७३६), मणेर नसीर इक्बाल (७५३), सुशांत पाटील (७५९), अक्षय कोंडे, (७६३), प्रमोद जाधव (७९०), प्रवीण किरसे (७९२), अजय पवार (७९७), तुषार घोरपडे (८१७), निखिल बोरकर (८२५), अभिजीत इचके (८४४), सुरज थोरात (८६८), वैभव काजळे (८८०), रूपेश शेवाळे (९२०), प्रवीण शिनारे (९३३), सुनील कुमठे (९६२), दत्तात्रय शिवम (९६८), जयपाल देठे (९७०), अविनाश शिंदे (९७८), प्रज्ञा खांडरे (९८४), के रंजितकुमार (९८७), अमोघ थोरात (९९५), अनिल भागुरे (१००४), सत्पतसिंग कांबळे (१०१०), प्रितमकुमार तुरेराव (१०३१), वर्षा कारंडे (१०९८)स्वयंअध्ययनावर भरयुपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना मी स्वयंअध्ययनावर भर दिला. सध्या मी ससून रुग्णालयात न्यायवैद्याक विभागात वैद्याकीय अधिकारी आहे. मूळचा धुळ्याचा असून वडील शिक्षक, तर आई गृहिणी आहे. परीक्षेच्या आधी मला सुट्टी घेऊन अभ्यास केला. इतर वेळी कामानंतर अभ्यासासाठी वेळ काढत होतो. रँक उंचावण्यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे.- डॉ. वसंत राजपूत, रँक- ३२६हार्ड वर्क व स्मार्ट वर्क यांचा घालावा मेळ : किरण खरेयूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घालून अभ्यास केला पाहिजे. परीक्षेच्या गरजा काय आहेत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. मी दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालो. सीओईपीमधून मेकॅनिकल इंजिनिअरींग केल्यानंतर गेल्या अडीच वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होतो. मी मुळचा औरंगाबाद जिल्हयातील कन्नड तालुक्यातील आहे. वडील शेतकरी आहेत, तर आई गृहिणी आहे.