शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Marathi Bhasha Din : 'मराठी करून सोडावे सकळजन!'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 11:46 AM

लहानपणापासून मला वाचन, भाषा, साहित्य याची आवड आहे. मी शाळेत असताना गंमत म्हणून गुजराती आणि तमिळ भाषा शिकलो.

- कौशिक लेले

लहानपणापासून मला वाचन, भाषा, साहित्य याची आवड आहे. मी शाळेत असताना गंमत म्हणून गुजराती आणि तमिळ भाषा शिकलो. मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा तिथल्या तमिळ लोकांशी तमिळमध्ये बोलायचो. हे बघून लोकांना आश्चर्य वाटायचं. मी तमिळ शिकलो तसं तेही मराठी शिकू शकतील, मी त्यांना शिकवू शकेन असं त्यांना वाटलं. त्यांना मराठी शिकवायची मीसुद्धा तयारी दाखवली. 

मी तमिळ शिकलो एका छोट्याशा पुस्तकातून. त्यामध्ये वाक्यरचनेचे व्याकरण स्पष्ट केले होते. त्यामुळे महिनाभराच्या आत मी स्वतः छोटी वाक्यं तयार करून बोलू लागलो होतो. वाचन सुरू करून डिक्शनरीच्या मदतीने नवीन शब्द शिकत होतो. मला वाटलं की मराठी शिकायलाही खूप साहित्य उपलब्ध असेल. ऑनलाइन नाही पण पुस्तकं तर असतील. थोडी शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की बहुतेक सर्व वेबसाईट्सवर, पुस्तकात नेहमीच्या वापरातील पन्नासेक वाक्यांचं मराठी तयार भाषांतर असतं; थेट तयार संवाद असतात. मग फळांची, फुलांची, प्राण्यांची नावे अशी यादी असते. पण, अशी १०-२० किंवा अगदी १०० वाक्यं पाठ केली तरी, कोणाला मराठी येणार नाही. १०० वाक्यं पाठ झाल्यावर १०१वं वाक्य त्या व्यक्तीला स्वतः तयार करता येणार नाही. या वस्तुस्थितीमुळे मी अस्वस्थ झालो. 

मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने तांत्रिक बाबींसाठी सतत इंटरनेटवरून लोकांनी लिहिलेले ब्लॉग्स, ट्युटोरियल्स, टिप्स, सोल्यूशन्स यांचा सतत वापर करत होतो. इंटरनेटच्या ज्ञान साठ्यातून "घेणाऱ्याच्या हाताचा" एक दिवस "देणाऱ्याचा हात व्हावा" ही बऱ्याच दिवसांची इच्छा आणि मराठी शिकवण्याची ही संधी यातून या ऑनलाईन ट्युटोरियल्सचा जन्म झाला.  मे २०१२ मध्ये मी या उपक्रमाची सुरुवात केली.

एकेक धडा लिहिताना पुढच्या धड्याचा आराखडा सुचू लागला. ऑफिसमधून घरी आल्यावर, शनिवार-रविवार कधी एकदा हे काम करायला बसतो आहे असं होऊन जायचं. मला आठवतंय की ब्लॉग सुरू केल्यावर चार महिन्यांनी पहिली प्रतिक्रिया आली. तिही क्रिस यंग या एका परदेशी तरुणाची.  - “Dear Kaushik, I am a 25yo white American who has been dating a Maharashtrian girl for the last two months and have been searching for a good resource to learn MarAThI online, because I might meet her parents in Pune this November. Anyway, your blog is BY FAR the best of any online or printed resource that I have come across. It has helped me tremendously. Your Latin orthography (writing system), the depth and conciseness of your lessons, and the order in which you cover the topics has been both a tremendous help and an enjoyable task for me. I could go on and on, explaining all the right things you have done with those language lessons, but I want to be concise as well. Quite Simply, Thank You !!”

अजून एक-दोन भारतीयांचे मेल आले की त्यांना ब्लॉग आवडला आणि त्यातून ते शिकू लागले आहेत.

हे वाचल्यावर उत्साह अजून वाढला. माझ्या कल्पना आणि "विद्यार्थ्यांनी" विचारलेले प्रश्न यातून धडे तयार होऊ लागले. मूलभूत व्याकरण शिकवून झाल्यावर संवादांकडे वळलो आणि भाजीबाजारातला संवाद, डॉक्टर-पेशंटमधील बोलणं, फोनवरील संभाषण अशी बरीच संभाषणे त्यात समाविष्ट केली. 

मराठी आणि हिंदीचे साम्य लक्षात घेता भारतीय विद्यार्थ्यांना उत्तरं देताना हिंदीची उदाहरणं मी काहीवेळा दिली होती. इंग्रजी फार चांगलं नसणाऱ्यांनी हिंदीतून मराठी शिकवायची सूचनाही केली होती. म्हणून हिन्दी-ते-मराठी असे ट्युटोरियल सुरू केले. मी प्रत्येक मराठी वाक्य रोमन लिपीतही दिलेलं असल्याने विद्यार्थ्यांना शब्दांचे उच्चार कळत होते, तरीही त्यांना ही वाक्ये ऐकायला मिळाली तर ते अधिक प्रभावी वाटले असते. म्हणून ट्युटोरियलच्या लिखाणाचं काम पूर्ण झाल्यावर स्वतःच्याच आवाजात प्रत्येक धड्याचं रेकॉर्डिंग करून यूट्यूबवर अपलोड करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनीही त्याला उदंड प्रतिसाद दिला.

उदा. डॉ. प्रशांत कुमार म्हणतात –“ I am pursuing Masters of Public Health from Tata Institute of Social Sciences… I would recommend if anyone wants to learn marathi free of cost, either out of curiosity of learning new language or  due to demand of your job. This blog is worth. The main thing the recording which you hear their pronunciation is the best part. They make you feel that there is someone real who is teaching you.”

मी विद्यार्थ्यांच्या शंकांना इमेल वर आणि "लर्न मराठी" या फेसबुक ग्रूपवर उत्तरं देतो. माझी ट्युटोरियल्स वापरून मराठी शिकत असल्याचे आत्तापर्यंत दोनशे लोकांनी ईमेलवर कळवले आहे. महाराष्ट्रात शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त परराज्यातून आलेल्या व्यक्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मराठीचा अभ्यास करणाऱ्या अमराठी व्यक्ती, भाषांची आवड असणारे परदेशी नागरिक, अनिवासी मराठी आहेत. तसेच मराठी व्यक्तींच्या प्रेमात पडलेले किंवा लग्न केलेले परदेशी नागरिकही आहेत. गेल्या पाच वर्षात यूट्यूब चॅनलचे तीन हजारांहून जास्त सबस्क्रायबर आहेत तर व्हिडिओ सुमारे सात लाख वेळा बघितले गेले आहेत. जॉन हा लंडनस्थित ब्रिटिश पीएचडीचा विद्यार्थी; मॅथ्यू चँग नावाचा एक चायनीज-अमेरिकन युवक, चेक रिपब्लिक या युरोपियन देशातून पुणे विद्यापिठात संशोधनासाठी आलेला मार्टिन या परदेशी व्यक्तींना छान मराठीत बोलताना तुम्ही यूट्यूब वर पाहू शकाल.

मराठी भाषेचं काम पूर्णत्त्वास जात असताना काम पूर्ण झाल्याचा आनंद आणि आवडीचं काम आता फार राहिलं नाही याचं दुःख अशा मिश्र भावनेतून "पुढे नवीन काय?" हा प्रश्न मनात घुमत होता. त्यातूनच गुजरातीसाठीही अशाच ट्युटोरियल्सची गरज आहे हे जाणवलं. ते कामही चार वर्षांपूर्वी सुरू केलं मराठी प्रमाणे त्याचेही ट्युटोरियल्स, युट्यूब व्हिडिओ पूर्ण झाले आहेत.

"क्रियापद रूपावली" अर्थात एका क्रियापदाची प्रत्येक काळातली, प्रत्येक सर्वनामासाठीची, वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रुपे दाखवणारे संकेतस्थळ मी तयार केले आहे. मराठी शिकणाऱ्यांसाठी नामाचे लिंग, अनेकवचन, सामान्यरूप देणारा शब्दकोशही तयार केला आहे.

या सर्व उपक्रमांना फारच छान प्रतिसाद मिळाला असला तरी अजूनही मराठी शिकण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नाही असाच (गैर)समज सगळीकडे आहे. मराठी शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तीने गूगलवर बरेच शोधले तर त्याला माझ्या ट्युटोरियल पर्यंत पोहोचता येते. अजूनही कितीतरी इच्छुक या साईटची माहिती न मिळाल्यामुळे मराठी शिकण्यापासून वंचित राहिले असतील. पूर्वी इंग्रजी म्हटलं की "तर्खडकर भाषांतरमाला” हे समीकरण होतं; हल्ली इंटरनेट शोध म्हटलं की गूगल हे समीकरण आहे तसं मराठी शिकायचं म्हटलं की “कौशिक लेलेची वेबसाईट” हे समीकरण व्हावं अशी माझी इच्छा आहे. वेबसाईट अधिकाधिक उपयुक्त व्हावी आणि प्रत्येकापर्यंत तिची माहिती पोहोचावी असा माझा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नात तुमच्या सूचना, टीकांचे मी स्वागत करतो आणि प्रसारात तुमच्या सहकार्यासाठी नम्र विनंती करतो.

(लेखक सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते पुणे येथे व्हीएमवेअर या कंपनीमध्ये कार्यरत आहेत).

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018