शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:05 IST

एक तप सुरू आहेत प्रयत्न; साहित्य महामंडळाच्या दप्तरात अहवाल धूळखात पडून

- रवींद्र मांजरेकर मुंबई : शुद्धलेखनाच्या १८ नियमांनी अवघडलेल्या मराठी भाषेला मोकळी करण्याचा प्रयत्न १२ वर्षे सुरू आहे. त्या नियमांबाबत चर्चेअंती तयार झालेले दोन अहवाल मराठी भाषकांच्या मतदानासासाठी देण्याची सवड चार वर्षांत मराठी साहित्य महामंडळाला झाली नाही. आता मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अहवालांवरील धूळ झटकली जाईल का, असा अभ्यासकांचा प्रश्न आहे.महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कारित केलेल्या मराठी लेखनविषयक १४ नियमांना १९६२ मध्ये मान्यता देण्यात आली. पुढे १९७२ मध्ये महामंडळाने आणखी चार नियमांची भर घातली. या नियमांवर संस्कृतचा प्रभाव आहे. मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांना संस्कृतचेच नियम लावण्यात येतात. त्यामुळे मराठी शुद्धलेखनाचे नियम अवघड झाले आहेत. संस्कृतचे शब्द ओळखता येत नाहीत, ही अडचण भाषेच्या अभ्यासकांच्या लक्षात आली. त्यातून मार्ग काढण्यासाठी २००८ पासून प्रयत्न सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून २००८ ते २०१० या काळात महामंडळातर्फे मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपुरात चर्चासत्रे झाली. अभ्यासकांची मते घेतली. त्यावर विचार करण्यासाठी २०१४ मध्ये सात जणांची समिती नेमण्यात आली. डिसेंबर-२०१४ ते मार्च-२०१५ या काळात या समितीच्या सभा झाल्या.या समितीमध्ये मराठीप्रेमी आणि संस्कृतप्रेमी असे दोन गट पडले. संस्कृतसह कोणत्याही परभाषेतून आलेले शब्द हे मराठीच्या नियमाप्रमाणे चालतील, असा मुख्य बदल शुद्धलेखनाच्या नियमांत करावा. त्यामुळे मराठीचा वापर सोपा होईल आणि क्लिष्टता निघून जाईल, असा एक मतप्रवाह आहे. संस्कृतचे वेगळेपण सोडणे म्हणजे भाषेपासून दूर जाणे, असा दुसरा मतप्रवाह आहे. या मतप्रवाहांत एकवाक्यता न झाल्याने शुद्धलेखनाच्या सोप्या नियमांविषयी काहीच निर्णय झाला नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.शेवटच्या दिवशी प्रस्ताव देण्यासाठी अगदीच थोडा वेळ शिल्लक राहिल्याने प्रस्ताव नीट मांडता आलेले नाहीत. त्यामुळे आमच्याकडून सविस्तर प्रस्ताव मागवावेत आणि ते मराठी जनतेसमोर जावेत, अशी मागणी समितीचे एक सदस्य अरुण फडके यांनी केली आहे.संकेतस्थळावर टाका दोन्ही प्रस्तावतोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रस्ताव मराठी जनांच्या अभ्यासासाठी महामंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावेत, असे ठरले होते. त्यालाही आता चार वर्षे उलटून गेली, तरीही या प्रस्तावावरील धूळ झटकण्यास महामंडळ तयार नाही. मराठीच्या अभ्यासकांनी शुद्धलेखनाचा विचार करावा, असे आपले मत असल्याचे ठाले-पाटील म्हणाले.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिन