शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 12:09 IST

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले.

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणातून सकाळी 8.40 वाजता जायकवाडीसाठी 4250 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर मुळा धरणातून सहा हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात आले. 

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला नगर, नाशिक जिल्ह्यांतून विरोध होत होता. प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा काही नेत्यांनी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर 9 टीएमसी पाणी जायकवाडीला मिळणार आहे. 

मुळा धरणातून जायकवाडीसाठी आज सकाळी नऊ वाजता सहा हजार क्युसेक्सकने 11 दरवाज्यातून ( मो-या) पाणी सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता आठ हजार तर रात्री बारा वाजता  12 हजार क्युसेक्सकने पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्यापूर्वी तीन वेळा भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी कळ दाबून नदी पात्रात पाणी सोडले. जायकवाडीसाठी तीन दिवसात 1 हजार 9 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.  धरणाची साठवण क्षमता 26 हजार दलघफू आहे. 

निळवंडेतून जायकवाडीला 4250 क्युसेकने 5 मोऱ्यांमधून पाणी सोडण्यात आले. दर दोन तासांनी यामध्ये वाढ केली जाणार आहे. 

 

जायकवाडीसाठी नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता 3500 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाNashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई