शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, तर...! पण मराठ्यांना आपण कोण आहोत? हे कळत नाहीये, हे दुर्दैव" - भिडे गुरुजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:30 IST

"सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिजा मातेचं जीवन चरित्र, शहाजी राज्यांचं जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत, कुठल्याही भाषेतले लोक असोत, सक्तीचा करायला हवा."

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यानी महाराष्ट्रातील मराठा समाज आणि मराठा आरक्षण या विषयावर भाष्य केले आहे. "मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे," असे भिडे गुरुजी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते. 

यावेळी, "महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना, राष्ट्र गाडा न चाले।।" असे म्हणत संभाजी भिडे म्हणाले, "अरे, मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण हवे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाहीये, हे दुर्दैव आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत? हे जर समजले, तर देशाचे कोट कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नहीत."  यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला असता गुरुजी म्हणाले, ते प्रकरण आपण बाजूला ठेऊ. तो काही आपला विषय नाही. 

मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत सक्तीचा करायला हवा - पुढे बोलताना भिडे गुरुजी म्हणाले, "सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिजा मातेचं जीवन चरित्र, शहाजी राज्यांचं जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत, कुठल्याही भाषेतले लोक असोत, सक्तीचा करायला हवा. संस्कृत शिकवायल हवी देश टिकवायचा असेल तर. या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. पण हे करण्यची इच्छा उत्पन्न होईल, असे महाराष्ट्राचे शासनही असायला हवे. शिवाजी-संभाजी-शहाजी आणि जीजामाता या व्यक्तीमत्वांमुळेच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश." 

 

 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMaratha Reservationमराठा आरक्षणhistoryइतिहास