शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 12:40 IST

अजित पवार यांनीही नुकतीच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही याप्रकरणी लक्ष घालून मार्ग काढू, असं म्हटलं आहे.

Ajit Pawar ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'जरांगे फॅक्टर'चा फटका बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही याप्रकरणी लक्ष घालून मार्ग काढू, असं काल पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारकडून सगेसोयरे अधिसूचनेबाबत निर्णय घेण्यावर कोणी आणि काय बोलायचं, हे आमचं ठरलं आहे. आगामी काळात आम्ही यात लक्ष घालून मार्ग काढू," अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.

जरांगे यांनी समाजाला काय आवाहन केलं?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. सरकारकडून कुणीही भेटायला आलेले नाही. निवडणूक निकालानंतर कुणाचेही आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले.

मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका

मागील लोकसभा निवडणुकीत मतविभागणीला कारणीभूत ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीला बाजूला सारत बहुसंख्य दलित-मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा, शेतकरी-बेरोजगारांमध्ये असलेला असंतोष, फोडाफोडीच्या राजकारणामुळे सरकारविरोधात तयार झालेले जनमत आणि मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन अशा अनेक घटकांचा जबर फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला. परिणामी, मराठवाड्यात महायुतीची सात जागांवरून एका जागेवर घसरण झाली.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता उर्वरित सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यात भाजपला चार जागांचा फटका बसला तर काँग़्रेसला तीन जागांचा फायदा झाला. एमआयएमची एक जागाही गेली. शिवसेनेची फाटाफूट आणि धनुष्यबाण नसल्याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो, असे अनुमान निवडणूकपूर्व काढण्यात येत होते. मात्र मतदारांनी या शक्यतेला छेद दिला. छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली अशा चार जागा उद्धवसेनेने लढविल्या. पैकी संभाजीनगर वगळता इतर तिन्ही जागा ठाकरे यांना मिळाल्या आहेत.  

नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेतल्याचा फायदा भाजपला झाला नाही. उलट या फोडाफोडीचा फटकाच बसला. लातूरमध्ये डॉ. शिवाजीराव काळगे यांचा विजय काँग्रेसचे मनोबल उंचावणारा आहे. मराठा, लिंगायत, ओबीसी, मुस्लिम आणि काही प्रमाणात दलित मतांमुळे डॉ. काळगे विजयी झाले. जालन्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी पराभव केल्याने दानवे यांचा षटकार हुकला. दानवेंना जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला. मराठा आंदोलक मंगेश साबळे यांनी सुमारे सव्वा लाख मते घेऊनदेखील दानवेंना फायदा झाला नाही.

बीडमध्येदेखील भाजपच्या पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलनाचा फटका बसला. बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादात राष्ट्रवादीचे (शरद पवार) बजरंग सोनवणे यांचे पारडे जड राहिले! अगदी शेवटच्या ३२ व्या फेरीपर्यंत निकालात उलटफेर होत होता. शेवटच्या फेरीत सोनवणे  विजयी झाले. परभणीतही मराठा-ओबीसी असा वाद झाला. मात्र तिथे मराठा मतांशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची साथ मिळाल्याने उद्धव सेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांची हॅटट्रिक झाली.

मराठवाडा : २०२४ भाजप :    ० उध्दवसेना :    ३ काँग्रेस :    ३ शिंदेसेना :    १राष्ट्रवादी शरद पवार गट :    १२०१९ :भाजप :    ४ शिवसेना :    ३एमआयएम :    १ 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे