Maratha Reservation : उद्या गिरीश बापटांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:12 IST2018-08-01T21:11:20+5:302018-08-01T21:12:21+5:30
पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या घरासमोर उद्या (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

Maratha Reservation : उद्या गिरीश बापटांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या घरासमोर उद्या (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चापुणे जिल्हा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्यावतीने सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. याच मागणीसाठी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पालकमंत्री गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण आणि आमदार दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार सकाळी साडेआठ वाजता कसबा भागातील बापट यांच्या घरासमोर ठिय्या देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या लोकमान्यनगर भागातील घरासमोर सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येईल. सर्वात शेवटी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या गोळीबार मैदानाजवळील निवासस्थानी दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.