शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
3
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
4
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
5
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
6
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
7
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
8
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
9
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
10
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
11
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
12
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
13
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
14
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
15
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
16
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
17
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
18
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
20
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !

मराठा आरक्षण; तातडीने घटनापीठ स्थापन करा, राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 07:51 IST

Maratha reservation News : राज्य सरकारने सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहून घटनापीठ स्थापन करण्याबरोबरच मराठा आरक्षणावरील हंगामी आदेश रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करण्याचीही मागणी केली आहे.

 नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवडे पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहून घटनापीठ स्थापन करण्याबरोबरच मराठा आरक्षणावरील हंगामी आदेश रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करण्याचीही मागणी केली आहे.यापूर्वीही ७ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने सुनावणी  तातडीने घेण्याचा अर्ज केला होता. परंतु त्यास १० ऑक्टोबरपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे १० ऑक्टोबर रोजी पुन्हा यासंदर्भात अर्ज करण्यात आला असता हे प्रकरण विस्तारित न्यायपीठाकडे असल्याने ते योग्य वेळी सुनावणीसाठी येईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी  सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी आणि कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवावे, असा युक्तिवाद केला हाेता. त्यावर न्या. नागेश्वर राव यांनी सुनावणी प्रकरण पुढे ढकलताना घटनापीठाकडे सोपविण्यासाठी अर्ज करण्याचे सूचित केले होते. चार आठवड्यांत तुम्ही अर्ज करू शकता, असेही न्यायमूर्ती राव यांच्या खंडपीठाने सांगितले. त्यानुसार सरकारने अर्ज केला. सरन्यायाधीशांनी चार आठवड्यांत घटनापीठ स्थापन केल्यास हे प्रकरण सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाऊ शकेल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार