शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मराठा आरक्षणास स्थगिती नाही; पुढील सुनावणी १७ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 03:30 IST

सरकारी नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

नवी दिल्ली/मुंबई : सरकारी नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मार्च रोजी होणार आहे.

या प्रकरणाचा खटला प्रलंबित असून त्यावर सविस्तर सुनावणी आवश्यक आहे, असे न्या. एल. नागेश्वर राव व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. या खटल्यातील दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे व उत्तरे पुढील सुनावणीपूर्वी सादर करावीत. या खटल्यामध्ये पुन्हा अंतरिम स्थगिती आदेश देणार नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. गोपाल शंकरनारायणन म्हणाले की, एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाराष्ट्र विधिमंडळाने केलेला कायदा योग्य असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी.

मराठा समाजाला सरकारी नोकºया व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१९ रोजी घेतला होता. मात्र कायद्याची २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण लागू होणार नाही असेही स्पष्ट केले होते. या आरक्षणाविरोधात जे. लक्ष्मणराव पाटील व वकील संजीव शुक्ला यांच्यासह पाच जणांनी याचिका दाखल केल्या आहेत.

अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेत उपसमिती

मराठा आरक्षण व संबंधित विषयांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ४ मंत्र्यांची उपसमिती नेमली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका, सारथीद्वारे मराठा समाजाच्या कल्याणासाठी राबवायच्या योजना आदींबाबत ही उपसमिती सरकारला शिफारस करेल. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील व ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे समितीचे सदस्य असतील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAshok Chavanअशोक चव्हाणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHigh Courtउच्च न्यायालय