शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 13:14 IST

Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे.

औरंगाबाद - छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मांडले आहे. तसेच मराठा आरक्षणावर बोलू नका, असा फोन बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला आला आहे. माझ्याच पक्षाकडून माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनात पत्रकार परिषदेत बोलताना केला. जाधव म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. आपल्याला फक्त फिरविले जात आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर बसण्याची गरज आहे, तशी भूमिका कुठलाही पक्ष घेण्यास तयार नाही. माणसे मरत असताना माझा पक्ष मला म्हणतो, आरक्षणाबाबत बोलायचे नाही. याला तोडगा एकच आहे, आपले छत्रपती शासन आणणे. मराठा बांधवांनी यावर विचार करावा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करणे गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. आपली माणसे निवडून आणावी लागतील. "विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊनच अध्यादेश काढता येईल. त्याला तीन महिने लागतील. दोन वर्षांपासून समाजाचे मोर्चे निघत असताना आता तीन महिने कशासाठी लागत आहेत. याचा अर्थ असा आहे की, आरक्षण द्यायचे नाही. वेळकाढू धोरण सरकार राबवीत आहे. मराठा युवक नैराश्यात येत आहेत. समाजाने नैराश्यात जाण्याऐवजी स्वतंत्र राजकीय पक्ष काढून लढले पाहिजे." असा सल्ला जाधव यांनी दिला. पक्षप्रमुखांनीही फोन घेतला नाहीशिवसेनेचे गटनेते तथा मंत्री शिंदे यांनी फोन करून आरक्षणावर न बोलण्याची ताकीद दिली, ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली काय, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पक्षप्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. त्यांची भेटही झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडूनही काही दाद मिळाली नसल्याचे आ.जाधव म्हणाले. त्यांच्या विधानामुळे शिवसेनेची मराठा आरक्षणाच्या प्रकरणात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आ.जाधव म्हणाले, छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvidhan sabhaविधानसभा