शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आम्ही मराठा समाजासोबत आहोत बोलणारे सहकुटुंब फिरायला गेलेत; उदय सामंतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 16:25 IST

मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत

मुंबई - काही लोक नेहमी बोलत होते आम्ही मराठा समाजासोबत आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळाले पाहिजे तेच लोक काल सहकुटुंब फिरायला गेले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू होते तरी ही हेच लोक सह परिवार आम्ही ज्या विमानतळावर उतरलो त्याच विमानतळावरून फिरवायला गेले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्यासाठी सरकारने याआधीच काम सुरू केलेले आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केलेले आहे. शिंदे समिती या विषयावर गंभीरपणे जोमाने आणि चांगले काम करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे आणखीन मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडतील त्यासाठी काम सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच  काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले म्हणून अनेक लोकांचे वाईट मनसुबे उधळून गेले. मराठा समाजाने २०१४ ते २०१९ मध्ये लाखोंच्या संख्येने शांतपणे संयमाने महाराष्ट्रात मोर्चे काढले कधीच हिंसाचार केला नाही परंतु यावेळेस काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून सरकारला आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आवाहन केले होते की शांत रहा जाळपोळ आणि तोडफोड करू नका तरी सुध्दा काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घाव्यात तर त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिलेल्या आहेत. पहिल्या आंदोलनाच्या केसेस येत्या १५ दिवसात मागे घेतल्या जातील आणि बाकीच्या महिन्याभरात सर्व केसेस मागे घेतले जातील. शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई द्यावी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४४१ शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्यात येणार, असे सांगितलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने लेखी स्वरूपात नोंदी करून तसे काम सुरू केलेले आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं.

दरम्यान, मी कालच्या शिष्ट मंडळात होतो आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्ही सखोल चर्चा केली. त्यांना आम्ही विश्वास दिला की आमचे सरकार मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण देणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असा आम्ही त्यांना ठाम विश्वास दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या दोन महिन्यात सरकार अधिक मनुष्यबळ वापरून अधिक वेगाने काम करणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील