तुम्ही सागर बंगल्यावर येणार अन् आम्ही काय गप्प बसणार का? नितेश राणेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 04:22 PM2024-02-25T16:22:56+5:302024-02-25T16:23:39+5:30

मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Maratha Reservation Manoj Jarange Patil: you Will come to Sagar Bungalow and we will keep quiet? Nitesh Rane's counter attack | तुम्ही सागर बंगल्यावर येणार अन् आम्ही काय गप्प बसणार का? नितेश राणेंचा पलटवार

तुम्ही सागर बंगल्यावर येणार अन् आम्ही काय गप्प बसणार का? नितेश राणेंचा पलटवार

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. आज(दि.) मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, मला संपवण्याचे कारस्थान होत आहे. त्यामुळे मी आता मुंबईतील सागर बंगल्यावर येतो', असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यावर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पलटवार केला आहे.

"फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी"

मनोज जरांगेंच्या आरोपानंतर नितेश राणे यांनी जरांगे यांच्यावर पलटवार केला. 'मला प्रश्न पडतोय की, मनोज जरांगेंना मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राजकारण करायचे आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाले आहे. आता कोर्टात लढाई लढली जाणार आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा आधार आहे.'

'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट

'देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यामागे काय पार्श्वभूमी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय केलंय. जरांगे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यावर का कधीच टीका करत नाहीत. फक्त देवेंद्र फडणवीसांवर का टीका करतात? जरांगे सागर बंगल्यावर येणार तर आम्ही काय गप्प बसणार का? आम्हीपण मराठे आहोत. जरांगे येत असतील, तर त्यांच्यासमोर आमची भिंत उभी असेल, ती क्रॉस करुन दाखवा, मग पुढचे पुढे बघू,' असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

Web Title: Maratha Reservation Manoj Jarange Patil: you Will come to Sagar Bungalow and we will keep quiet? Nitesh Rane's counter attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.