शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पोलिस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षण लागू; एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 08:05 IST

मराठा आरक्षणाविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकांवर याचिका दाखल व्हायला सुरुवात.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : राज्यातील आगामी पोलिस व शिक्षक भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले. आमच्या सरकारने एवढ्या लवकर आरक्षण दिले आणि हे आरक्षण टिकणार असून त्याचा तत्काळ लाभ मिळायला सुरुवात झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षण कसे टिकणार याची कारणे आमच्याकडे आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरक्षण देण्याचा प्रामाणिकपणा मी पाहिला आहे. काही जण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकविले, दुर्दैवाने सरकार बदलले आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केला.

उच्च न्यायालयात आव्हानमराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गात (एसईबीसी) सरकारी नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याबाबत  राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केलेल्या कायद्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

n२० फेब्रुवारी रोजी मंजूर केलेल्या कायद्याची २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढण्यात आली.  हा कायदा निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील  राज्य मागासवर्ग आयोगाच्या (एमएसबीसीसी) अहवालावर आधारित राहून राज्य सरकारने कायदा तयार केला. या कायद्याला ॲड. जयश्री पाटील यांनी आव्हान दिले. 

nॲड. पाटील, गुणरत्न सदावर्ते, शंकरराव लिंगे आणि राजाराम पाटील यांनी याचिकेत न्या.शुक्रे यांची आयोगावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यावरही आक्षेप घेतला आहे. याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करू नये आणि एसईबीसीमधून सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण देण्याबाबत कोणतीही जाहिरात न काढण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. 

nमराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनीही आपली बाजू ऐकण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण