शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

सरकारचं शिष्टमंडळ भेटीला; आंदोलन मागे घेणार? जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:42 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याहून मुंबईकडे कूच करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा लोणावळ्यात पोहोचला आहे. कुठे पदयात्रा तर कुठे वाहनांनी प्रवास करत मनोज जरांगे पाटील सरकारला घेरण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. हजारो आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तर सरकारची मोठी कोंडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे. मात्र आधी मी समाजाशी चर्चा करणार आणि मग शिष्टमंडळाने नव्याने आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करेन, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

"आम्हाला आरक्षण हवं आहे आणि ते मिळाल्यावर आम्ही पुन्हा घरी जाऊ. मग ते बीडमध्ये मिळू, पुण्यात मिळू, लोणावळ्यात मिळू की वाशीला मिळू. आम्ही काय मुंबईत कायमचं राहायला चाललेलो नाहीत. आरक्षण मिळालं की आम्ही माघारी जाऊ," असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. मात्र तपासून बघू, निर्णय घेऊ अशी भाषा शिष्टमंडळाची असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.

रात्रीच्या सभेला सकाळी सुरुवात

मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे 6.45 वाजले. सकाळी 6 वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले. त्यानंतर आता त्यांच्या सभेला सुरुवात झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी अनेक नागरिक शेकोट्या पेटवून बसले होते. याविषयी पहाटे चार वाजता त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या मुला बाळांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमचा मनोज दादा रात्रंदिवस जागा असताना आम्हाला झोप कशी येणार अशी बोलकी प्रतिक्रिया सभास्थळी असलेल्या लोकांनी दिली.         दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने आणलेला नवा प्रस्ताव मनोज जरांगेंना मान्य होणार का आणि ते आपलं आंदोलन मागे घेणार का, हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणlonavalaलोणावळाState Governmentराज्य सरकार