मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 05:42 IST2025-08-29T05:26:03+5:302025-08-29T05:42:23+5:30
मराठा आरक्षण आंंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ धडकले आहेत. शुक्रवारी पहाटे हे आंदोलक पनवेलजवळील पळस्फे फाट्यापर्यंत आंदोलक पोहचले होते.

मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
मराठा आरक्षण आंंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ धडकले आहेत. शुक्रवारी पहाटे हे आंदोलक पनवेलजवळील पळस्फे फाट्यापर्यंत आंदोलक पोहचले होते. आता उलवे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून नवी मुंबई वाशी टोलनाक्यावरून या आंदोलकांचा मुंबईत प्रवेश होणार आहे. यावेळी वाशी टोलनाक्यावर सकल मराठा समाज नवी मुंबईचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची वाट पहात उभे आहेत.
दरम्यान, पहाटे मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांसाठी वाशी गावाजवळ सकल मराठा समाज व सामाजिक संघटनांनी अल्पोपाहार व चहाची व्यवस्था केली आहे. महामार्गावर मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याची वाट पहात आंदोलकांनी ठिकठिकाणी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा तिथे देण्यात येत आहेत.