स्नेहा मोरे मुंबई : आझाद मैदानावर बुधवारी सुरू असलेला मराठा बांधवांचा गजर दिवसभर सोशल मीडियावरही दिसून आला. फेसबुक, टिष्ट्वटर असो वा व्हॉट्सअॅप या सर्वच सोशल साइट्सवर सकाळपासूनच मोर्चाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. विशेषत: फेसबुकवर बºयाच नेटिझन्सनचे ‘चेक इन’ आझाद मैदान दाखवित होते.मंगळवारी रात्री प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पोस्ट करून‘एक मराठा, लाख मराठा’ असे टिष्ट्वट केले. फेसबुकवर काही काळ ‘एक मराठा, लाख मराठा’ हेसुद्धा ट्रेंडिगमध्ये होते. फेसबुक, व्हॉट्सअॅपवरून प्रचार आणि प्रसार करताना ‘वेडात मराठे वीर दौडले लाख’, ‘कुणी चला म्हणण्याची वाट पाहू नका, कुणाच्या मदतीची अपेक्षा करू नका, आहे त्या परिस्थितीत मुंबई गाठायची, मराठा समाजाची ताकद दाखवायची’, ‘न भूतो न भविष्यती असा सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा मराठ्यांचा मोर्चा जग पाहील, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा’ अशा प्रकरच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.या मोर्चात महिला आणि तरुणींचा सहभाग वाढविण्यासाठी ‘जिजाऊंच्या लेकींसाठी, लेकरांच्या भविष्यासाठी मोर्चात सहभागी व्हा,’ अशा आशयाच्या पोस्टने नेटिझन्सला आकर्षित केले. मराठा समाजाचा इतिहास अधोरेखित करणाºया पोस्ट्स मोर्चाच्या निमित्ताने व्हायरल झाल्या. बुधवारी सायंकाळी मोर्चात सहभाग दर्शविल्याबद्दल ‘आभार प्रदर्शना’च्या पोस्टनेही नेटिझन्सचे लक्ष वेधले.
मराठा मोर्चा : सोशल मीडियाही ‘मराठा’मय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 04:28 IST