आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्चा; ८ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 02:42 AM2020-11-30T02:42:19+5:302020-11-30T07:05:11+5:30

शब्द न पाळल्याचा आरोप : ओबीसी नेत्यांनी मन मोठे करण्याची भूमिका 

Maratha community march for reservation; It will hit the Vidhan Bhavan on December 8 | आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्चा; ८ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार

आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्चा; ८ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार

Next

पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ८  डिसेंबर रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात समाज वाहनांमधून सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ओबीसी नेत्यांनी मन मोठे केल्यास हा प्रश्न कोर्टाबाहेर मार्गी  लागेल, अशी भूमिकाही मांडण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात झाली.  त्यानंतर राजेंद्र कोंढरे ही माहिती दिली. कोंढरे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर विपरीत परिणाम झाला आहे. अकरावी प्रवेशात अनेकांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. वैद्यकीय प्रवेशाबाबत मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. एमएसईबी व इतर नोकरभरतीबाबत दिलेला शब्द फिरविला आहे. कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळण्याआधीच शिक्षणमंत्र्यांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविल्याने  दुसऱ्या यादीत प्रवेश मिळू शकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे गायकवाड यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. याविरोधात  ८ तारखेला मुंबईतील विधानभवनावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.  तत्पूर्वी, दि. १ व २ डिसेंबर रोजी महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. राज्यभरातून आरक्षणासंदर्भात निवेदने घेऊन सुप्रीम कोर्टाच्या पाठविली जाणार आहेत. 

राजेंच्या राजकीय भूमिकांना पाठिंबा नाही

  • खासदार संभाजीराजे आणि  खासदार उदयनराजे यांच्या राजकीय भूमिकांना मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मोर्चा हा बिगर राजकीय असून दोन्ही राजेंचा सामाजिकदृष्टीने पाठिंबा आहे. 
  • पण त्यांच्या राजकीय भूमिकेवर मोर्चा काही भाष्य करणार नाही, असे नमुद करण्यात आले.  काही ओबीसी नेते मराठा विरुध्द ओबीसी असा वाद निर्माण करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी देण्याची मागणी करण्यात आली.

 

Web Title: Maratha community march for reservation; It will hit the Vidhan Bhavan on December 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.