Maratha Reservation: मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे

By सुनील पाटील | Published: September 14, 2023 07:59 AM2023-09-14T07:59:10+5:302023-09-14T07:59:49+5:30

Maratha Reservation: मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षांच्या गॅझेटमध्ये मराठा हा कुणबी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.

Maratha and Kunbi are not different! Jalgaon lawyers gave evidence of 50 years | Maratha Reservation: मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे

Maratha Reservation: मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे

googlenewsNext

- सुनील पाटील 
​​​​​​​ जळगाव - मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षांच्या गॅझेटमध्ये मराठा हा कुणबी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता. जळगावातील ज्येष्ठ वकील गोपाळ जळमकर यांनी गॅझेट व न्यायालयांच्या निर्वाळ्यांचे पुरावे  ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिले आहेत.

ॲड. गोपाळ जळमकर यांनी दिलेल्या पुराव्यानुसार, बॉम्बे गॅझेटियर, खंड १९ पृष्ठ ७५, मराठा संपूर्ण सातारा जिल्ह्यात आढळतात. १९८१ च्या जनगणनेत ‘कुणबी’ अंतर्गत त्यांचा समावेश आहे, बॉम्बे गॅझेटियर, पुना खंड. XVIII, भाग-१ कुणबी या शब्दामध्ये ‘कुणबी’ आणि ‘मराठे’ असे दोन मुख्य वर्ग समाविष्ट आहेत. शेती करणारे मराठा म्हणजे कुणबी, असा निर्णय  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला हाेता. 

विविध ग्रंथातही उल्लेख
काशीराव बापूजी देशमुख यांनी १९२७ मध्ये लिहिलेल्या ‘क्षत्रियांचा प्राचीन इतिहास’ या ऐतिहासिक ग्रंथात मराठा व कुणबी हे एकच असल्याबद्दल अनेक दाखले दिले आहेत. त्यात वर्धा येथील सत्र न्यायालयाचा आदेशाचा संदर्भ दिला आहे. महात्मा फुलेंच्या १८८३ मधील ‘शेतकऱ्यांचा आसूड’ पुस्तकातील नोंदीनुसार मराठा हा कुणबीच असल्याचे सिद्ध होते, असे ॲड. गोपाळ जळमकर यांनी म्हटले आहे.

Web Title: Maratha and Kunbi are not different! Jalgaon lawyers gave evidence of 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.