शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

देशभरातील कलाकारांचे मॅपिंग होणार; ७१३ जिल्ह्यात राबविणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 07:00 IST

आता केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील कलाकार, कलाप्रकार आणि त्यांचे ठिकाण यांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर कलात्मक,दृश्यात्मक  आणि साहित्य. या तिन्हींचे मिळून 86 उपप्रकार देशातल्या ७१३ जिल्हयातल्या कलाकार, कलाप्रकार आणि लोकेशन यांचे मॅपिंग

पुणे : शासन स्तरावर कलाकार मंडळींसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. पण त्या कलाकारांपर्यंत पोहोचतच नाहीत. यासाठी आता केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील कलाकार, कलाप्रकार आणि त्यांचे ठिकाण यांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला असून, याद्वारे देशभरातील ७१३ जिल्ह्यांमधील कलाकारांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. ‘कल्चरल मॅपिंग मिशन ऑफ इंडिया’ असे या मिशनचे नाव आहे.        अर्थतज्ञ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी देशभरातील कलाकारांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला होता. त्याला मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, या मॅपिंगच्या तांत्रिक कामाला सुरूवात झाली आहे. करंजीकर हे या ‘कल्चरल मॅपिंग मिशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आहेत. यासंदर्भात दीपक करंजीकर म्हणाले, भारताला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. कलेसाठी अनेक कलाकारांनी आयुष्य समर्पित केले आहे. मात्र वयाच्या उतरत्या काळात त्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते. शासनाच्या योजना तळागाळातील कलाकारांपर्यंत न पोहोचणे हे याचे प्रमुख कारण आहे. यासाठीच देशभरातील कलाकारांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला होता. मँपिंगच्या माध्यमातून कलाकारांची डेमोग्राफी तयार होऊ शकेल. उदा: तो कलाकार कोणत्या भागातला आहे? तो कोणते वाद्य वाजवतो? याचा डेटा संकलित करण्यात येणार आहे.  प्रत्यक्षात कला ही तीन प्रकारात मोडते. कलात्मक,दृश्यात्मक  आणि साहित्य. या तिन्हींचे मिळून 86 उपप्रकार आहेत. देशातल्या ७१३ जिल्हयातल्या कलाकार, कलाप्रकार आणि लोकेशन यांचे मॅपिंग केला जाणार आहे. याद्वारे एक राष्ट्रीय डेटाबेस तयार होऊ शकेल. हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या पसंतीस उतरला.  शासनाने याचा सविस्तर तपशील तयार करण्यास सांगितले. त्यानुसार एक मिशन डॉक्यूमेंट तयार केले. या प्रस्तावाची प्रत्यक्षात अमंलबजावणी करायची झाल्यास पोर्टल विकसित करावे लागणार आहे. एका मोबाईल अँपच्या माध्यमातून सर्व गोष्टी एकत्रित करण्याचा विचार आहे. कारण एकाच ठिकाणी बसून कुणीही अनेक फॉर्म भरू शकतो. त्यातून फसवेगिरी होऊ शकते. मोबाईल अ‍ॅपमुळे त्याला आळा बसू शकणार आहे. या मॅपिंगच्या तांत्रिक कामाला सुरूवात झाली आहे. याला सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ........’ देशामध्ये परंपरागत कला जोपासल्या जात आहेत. पद्मश्री ते नवशिकाऊ अशी कलाकारांची एक साखळी आहे. कलाप्रकारांना टिकविले नाही किंवा कलाकारांना व्यवस्थित मदत मिळाली नाही तर देश बकाल होऊ शकतो- दीपक करंजीकर, अध्यक्ष, कल्चरलपिंग मिशन ऑफ इंडिया

मॅपिंगचे फायदे काय?*कलाकारांचा राष्ट्रीय पातळीवरचा डेटा बेस तयार होईल* सरकारच्या शिष्यवृत्ती योजना, अनुदान कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक ओळख तयार होईल.*मधल्या यंत्रणांची गरज भासणार नाही. पैसे थेट कलाकारांपर्यंत पोहोचतील.

 

टॅग्स :PuneपुणेartकलाTheatreनाटक