एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:56 IST2025-08-04T13:46:32+5:302025-08-04T13:56:07+5:30

Deputy CM Eknath Shinde News: काही जणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

many mahant join shiv sena in presence of deputy cm eknath shinde party will be strengthened in belgaum karnataka | एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत

एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत

Deputy CM Eknath Shinde News: हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातीलबेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प. पु. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातीलबेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने बेळगावात शिवसेना पक्ष वाढीला चालना मिळणार आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार

महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता, मात्र आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली. साधुसंतांचे आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, प. पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुवेल शेट्टे महाराज, मयुर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात महाराज, दिपा फडणवीस महाराज, अरविंद शिरळाकर महाराज, दादा महाराज, अजय घराडे महाराज यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. 

 

Web Title: many mahant join shiv sena in presence of deputy cm eknath shinde party will be strengthened in belgaum karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.