शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 09:49 IST

महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

ठळक मुद्देमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावरपंढरपूर व उस्मानाबाद येथील कार्यक्रमांना राहणार उपस्थितआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

सोलापूर : 'राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून लवकरच ते राजीनामे देऊन भाजपमध्ये दाखल होतील,' असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

  सोलापुरात आल्यानंतर ते बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश करण्यास राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तत्पूर्वी असे इच्छुक आमदार आपले राजीनामे सादर करतील, नंतर त्यांना भाजपात घेतले जाईल. राजीनामे सादर करणाऱ्या आमदारांची नावे लवकरच पुढे येतील, असेही ते म्हणाले.    सोलापूर जिल्ह्यातील असे आमदार संपर्कात आहेत का, असे विचारले असता महसूल मंत्री पाटील म्हणाले, बरेच जण आहेत. त्यांची नावे आत्ताच सांगता येणार नाहीत. अशा आमदारांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की योग्य वेळ आल्यानंतर सर्वांना न्याय दिला जाणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. निवडून येण्याची क्षमता पाहूनच पावले उचलली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही 7 उमेदवार बदलले. ते सर्व जण निवडून आले. विधानसभेसाठी 220 जागा निवडून आणायच्या निश्चयाने आम्ही रचना करीत आहोत. 

  भाजप-सेना युती होईल का, असे विचारले असता ते म्हणाले की आमचं ठरलेलं आहे. मात्र काय ठरलं आहे, हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच माहिती आहे. लवकरच तो फॉर्म्युला बाहेर येईल आणि यशस्वी होईल. जिथे स्थानिक आमदार आहे, ती जागा त्याच पक्षाला राहील. इतर जागावाटपाबाबत लवकरच निर्णय होईल.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलPandharpurपंढरपूरOsmanabadउस्मानाबादvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस