शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे अनेक आमदार, खासदार आणि नेते आमच्या संपर्कात- अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 12:04 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील नेत्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे.

ठळक मुद्देपाच राज्यांमधल्या निवडणुकीतल्या पराभवाचा महाराष्ट्रातील भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता भाजपाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचं अजित पवारांनी विधान केलं आहे. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते परत घरवापसी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्याने महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील नेत्यांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे. विशेष म्हणजे याचा महाराष्ट्रातील भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते परत घरवापसी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.गेल्या अनेक काळापासून आघाडीतून भाजपात गेलेल्या नेत्यांची कोंडी केली जातेय. त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत होता. परंतु आता ते मोकळेपणाने बोलू शकणार आहेत. तसेच भाजपाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणू, असंही अजित पवार म्हणाले आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्ष बदलण्याच्या हालचालींना सुरुवात केली आहे.भाजपा विरोधात असलेले वातावरण आणि पक्षामध्ये होणारी कोंडी या दुहेरी कात्रीत सापडलेले नेते, आमदार आणि खासदार लवकरच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये परतण्याची शक्यता आहे. तर काही नेते शिवसेनेतही जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस