Manoj Jarange Patil News: अचानक अशी संकटे शेतीवर येतात आणि शेती उद्ध्वस्त होत आहे. शेती आहे आणि नोकरीही आहे. त्यामुळे त्यांना डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्यांना आधार नाही, हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. आपण ताकदीने मराठा आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही. राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीने उभे राहायचे. शेतीला जोड नोकरी आणि शिक्षण आहे. यांनी कितीही डाव टाकली तरीही यांना हरवायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठ्यांचा जेवढा अपमान करता येईल, तेवढा प्रयत्न भुजबळ करत आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात. सगळीकडून उठतात आणि बीडमध्ये मोर्चा काढतात. सगळे नेते त्यांचे असणार, सर्व पदाधिकारी त्यांचे असणार. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, या शब्दांत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला.
छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो
छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो. छगन भुजबळ बावचाळला आहे. मराठ्यांचा वाटोळे करण्यासाठी तो काम करतो. आता त्याला महत्त्व देणार नाही, तो हतबल झाला आहे, त्याला वेड लागू शकते. काहीही बोलतो, म्हातारा येड्यासारखे करतो, असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, मराठे आणि छोट्या-छोट्या जातींचे संबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करत आहेत. आमच्या जीआरमुळे पिसाळल्यासारखा झालेत. फक्त आम्हाला धोका बसला तर सरकारवर आम्ही घसरणार. काही ओबीसीचे लोक मराठ्यांना टार्गेट करतात, अधिकारी टार्गेट करतात. विनाकारण मराठ्यांच्या विरोधात टोळी निर्माण केली. मराठ्यांना आरक्षणसाठी लढावे लागणार आहे, असे जरांगे म्हणाले.
Web Summary : Manoj Jarange Patil accuses Chhagan Bhujbal of being anti-Maratha and senile. He alleges Bhujbal is trying to create divisions between Marathas and other communities and is working against Maratha reservation. Jarange warns of action against the government if Marathas are targeted.
Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने छगन भुजबल पर मराठा विरोधी होने और सठिया जाने का आरोप लगाया। उन्होंने आरोप लगाया कि भुजबल मराठों और अन्य समुदायों के बीच विभाजन पैदा करने की कोशिश कर रहे हैं और मराठा आरक्षण के खिलाफ काम कर रहे हैं। जरांगे ने मराठों को निशाना बनाने पर सरकार के खिलाफ कार्रवाई की चेतावनी दी।