“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:29 IST2025-06-06T12:27:09+5:302025-06-06T12:29:20+5:30

Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

manoj jarange patil criticized cm devendra fadnavis said there should not be two shivrajyabhishek event it means you do not want people to be united | “दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत २९ ऑगस्टला आरक्षण मिळवून देणार ते पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल. आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी लागली नाही. ऑगस्टमध्ये मुंबई लाखो मराठा बांधवांनी जमावे आरक्षण घेऊनच दाखवतो कोण देणार नाही आरक्षण आरक्षण द्यावेच लागेल, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

किल्ले रायगडवरील शिवराज्याभिषेक निमित्त मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर असाच अन्याय होतच राहणार. त्या माणसाला मराठा समाजाबाबत इतका द्वेष आहे, इतका आकस आहे. मराठा समाजाला वाईट वागणूक देतात. त्यामुळे देशमुख परिवाराला छत्रपती शिवरायांच्या समोर येऊन नतमस्तक व्हावे लागत आहे. अन्यथा न्याय मिळण्याची मागणी करावी लागली नसती. न्याय आणि आशीर्वाद शेवटी राजांकडून मिळतील. याचा अर्थ असा होतो की, देवेंद्र फडणवीस मराठ्यांना न्याय देणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस यांनीच डाव मांडला आहे

देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले आहे. या प्रकरणाची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली. लोकप्रतिनिधींनी दोष देऊन उपयोग नाही. कारण हे तुम्हीच घडवून आणले. परंतु, समाज हा देशमुख कुटुंबासोबत आहे. आम्ही आहोत ना, कशी काय सूट देतात तेच पाहतो. देवेंद्र फडणवीस यांनीच डाव मांडला आहे. या प्रकरणातील अनेकांना सहआरोपी केलेले नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

दरम्यान, दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका दुजाभाव ठेवता कामा नये. सगळ्या जनतेचे जर मत हे ०६ जून असेल, तर त्याच तारखेला व्हायला हवा. दोन राज्याभिषेक सोहळा करण्याचा घाट विनाकारण घालता कामा नये. समाज दूषित होईल, असे वागू नये. संस्कार हिंदू धर्माचे, राज्याचे, देशाचे सांगायचे. छत्रपती शिवरायाचे विचार सांगायचे. मग एकाच जागेवर एकत्र शिवराज्याभिषेक सोहळा का नाही करायचा. याचा अर्थ तुमची भूमिका दुटप्पी आहे. तुम्हाला दाखवायचे एक आहे आणि करायचे एक आहे. तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.

 

Web Title: manoj jarange patil criticized cm devendra fadnavis said there should not be two shivrajyabhishek event it means you do not want people to be united

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.