शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Sanjay Raut "मंत्री दीपक केसरकर यांना जोड्यानं मारलं पाहिजे", 'त्या' विधानावरून संजय राऊत यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:43 IST

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांना जोड्यांनी मारलं पाहिजे आणि लोक त्यांना मारतील. जर शिवराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल असं  केसरकर यांना वाटत असेल तर ही मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

मालवणमधील राजकोट येथ उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच या घटनेविरोधात विरोधकांकडून आज मालवणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मालवणमध्ये शिवपुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत प्रतिक्र्या देताना  वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल आणि त्यामुळे हा अपघात घडला असेल, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर यांना जोड्यांनी मारलं पाहिजे आणि लोक त्यांना मारतील. जर शिवराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल असं  केसरकर यांना वाटत असेल तर ही मिंध्यांनी पोसलेली अफजल खानाची अवलाद आहे. ही घाण आमच्याकडून गेली हे बरं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, हे शब्द यांच्या तोंडामधून कसे काय बाहेर पडू शकतात, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला. 

ते पुढे म्हणाले की, पुतळा पडला हा शुभशकुन आहे, यातून काही चांगलं घडेल, असं हे म्हणतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केले. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झाले आहेत, हे मला कळत नाही. मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हे काम नरेंद्र मोदी यांनी केलं. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पाडला, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Rautसंजय राऊतDeepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार