मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:01 IST2025-07-31T17:57:32+5:302025-07-31T18:01:41+5:30
Malegaon Bomb blast 2008: विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालावर सरसंघचालक मोहन भागवत काय बोलले?

मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
Malegaon bomb blast case latest news: १७ वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. आरोपींविरोधात शंकेपलिकडे आरोप सिद्ध होत नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत सातही आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी तीन शब्दात उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, "संघाचा संबंध नाही."
राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालक प्रमिला मेढे यांचे नागपूरमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला.
२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा विशेष एनआयए न्यायालयाने ३१ जुलै रोजी निकाल दिला. या प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिलकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकरधर द्विवेदी यांना आरोपी करण्यात आले होते. या सर्वांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.