शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप-गॅस्ट्रोने ८,१३६ रुग्ण हैराण

By admin | Updated: November 8, 2014 04:14 IST

डेंग्यू या साथीच्या आजाराने जिल्हाभरात सुमारे ५२५ रुग्ण हैराण असतानाच गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर

सुरेश लोखंडे, ठाणेडेंग्यू या साथीच्या आजाराने जिल्हाभरात सुमारे ५२५ रुग्ण हैराण असतानाच गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर, गोवर इत्यादी साथीच्या आजारांनी ठाणे, पालघर जिल्ह्यांत डोके वर काढले आहे़ येथील शहरी व ग्रामीण भागांत आतापर्यंत सुमारे ८ हजार १३६ रुग्ण या आजारांनी त्रस्त आहेत. यातील हिवतापाने तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे डेंग्यूने दगावले आहेत़जिल्हा शासकीय रुग्णालयासह त्यांच्या नियंत्रणातील ६ रुग्णालये, तर जिल्हा परिषदेची सुमारे ६५ प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि महापालिका रुग्णालय परिसरात सुमारे १० हजार रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ इत्यादी साथीच्या आजारांनी हैराण आहेत. परंतु, प्राप्त अहवालानुसार शासकीय रेकार्डवर सुमारे ८ हजार १३६ रुग्ण मागील चार महिन्यांपासून आतापर्यंत साथीच्या आजारांनी जर्जर आहेत. तरीही, सद्य:स्थितीला जिल्ह्यात कोठेही साथीचा उद्रेक नसून प्रत्येक रुग्णालयात एक-दोन तापाचे रुग्ण उपचार घेत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़साथीच्या आजारांसह डेंग्यूच्या तापाने सुमारे ५२५ रुग्ण फणफणत असून, यापेक्षा तिप्पट रुग्ण डेंग्यूचे संशयित म्हणून उपचार घेत आहेत. डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघे मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील असले तरी मृतांमधील एक डेंग्यूचा संशयित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, ठाणे महापालिकेच्या परिसरात एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या साथीच्या आजाराने मुंबई, ठाण्यासह अख्खा महाराष्ट्र तापला आहे. यामध्ये ठाणे-पालघर जिल्ह्यांचादेखील समावेश आहे. यानुसार, ठाणे शहरासह मीरा-भार्इंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली मनपाचा काही भाग, भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसर तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील काही नागरी भागांस अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे.