राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल; बदल्या अन् बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला

By मनीषा म्हात्रे | Updated: April 24, 2023 19:02 IST2023-04-24T19:01:40+5:302023-04-24T19:02:15+5:30

एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना महासंचालक पदावर बढती

Major reshuffle of state police force; Transfers and promotions of Senior Police Officers | राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल; बदल्या अन् बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला

राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल; बदल्या अन् बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला

मुंबई -राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बढत्या आणि बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृहमंत्रालयाने काही अधिकाऱ्यांना बढत्या देत राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत.

एटीएस प्रमुख सदानंद दाते आणि ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना महासंचालक पदावर बढती देत ते सध्या कार्यरत असलेले पद उन्नत करुन त्याच ठिकाणी नियुक्ती दिली आहे. तर, अपर पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंह (आर्थिक गुन्हे महाराष्ट्र) यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर मनोज लोहिया यांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्त बनवण्यात आले आहे. 

खालील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. 

Web Title: Major reshuffle of state police force; Transfers and promotions of Senior Police Officers

टॅग्स :Policeपोलिस