शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्यातील आग्निकांडाप्रकरणी मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह पाच जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 20:24 IST

Bhandara fire : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडामध्ये दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देश हादरला होता.

मुंबई - काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडामध्ये दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देश हादरला होता. या अग्निकांडाप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने सिव्हिल सर्जनसह दोन परिचारिका आणि इतर दोन कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला होता. त्यानंतर आता आरोग्य विभागाने या प्रकरणी मोठी कारवाई करताना संबंधित रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता बडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच डॉ. सुनिता बडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्य तीन कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही नाईनने दिले आहे.दरम्यान, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे १० नवजात बाळांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला ५० पानी अहवाल तयार केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळाने आउटबॉर्न विभागात आग पसरली, असे समितीने अहवालात स्पष्ट केले असल्याची माहिती आहे.इन्क्युबेटरच्या वार्षिक तपासणीसाठी एम.कॉम. पास कर्मचारी नेमण्याचे दिव्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. फेबर सिंदुरी या कंपनीला  इन्क्युबेटर मेंटेनन्सचे काम देण्यात आले होते. मात्र त्या कंपनीने कोणत्या दर्जाचे कर्मचारी तेथे ठेवावेत याविषयी कसलाही करार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला नव्हता. परिणामी इन्क्युबेटरच्या स्फोटामुळे दहा नवजात बालकांचा बळी गेला, अशी धक्कादायक माहिती तपासणी अहवालातून पुढे आली आहे. या प्रकरणी  सिव्हिल सर्जन, दोन परिचारिका आणि काही कर्मचारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची शिफारस अहवालातून करण्यात आली होती.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगHealthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार