शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीने आतापर्यंत तब्बल १ कोटी 'लाडक्या बहिणीं'ना अपात्र ठरवले; शरद पवार गटाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:43 IST

Ladki Bahin Yojana: ''अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता' अशी महायुती सरकारची भूमिका असल्याचीही केली टीका

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना जवळपास दोन वर्षांपासून दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलासांठी सरकारने या योजेनेची घोषणा केली होती. त्यानुसार कोट्यवधी महिलांनी याचा लाभ घेतला. मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार झाले. काही पुरुषांनीही बनावट खाती उघडून पैसे घेतले. यानंतर लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली आणि त्यात तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शासनाची ही वागणूक म्हणजे 'अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता' अशी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली.

रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आताच्या क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती, तेव्हा परिस्थिती काय होती?" असा सवाल त्यांनी केला.

आकडेवारीसह हल्लाबोल

"लाडकी बहीण योजनेत सुरुवातीचे लाभार्थी २.५३ कोटी होते. सुरुवातीचे बजेट सुमारे ४५,००० कोटी रुपये होते. तपासणीनंतर संभाव्य पात्र लाभार्थी आता १,४८,६०,००० इतके शिल्लक राहिले आहेत. २०२६-२७ बजेटमध्ये यासाठी २६,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ संभाव्य अपात्र महिला सुमारे १.०५ कोटी आहेत. म्हणजे निवडणूक होती तेव्हा शासनाने सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले. निवडणुका जिंकल्या तर हळूहळू लाडक्या बहिणींवरचे प्रेम कमी होऊ लागले," असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्रतेच्या तपासणीनंतर मोठ्या संख्येने महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे १ कोटी ५ लाख महिला विहित निकषांवर पात्र ठरत नाहीत. हेच लक्षात घेऊन यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ १.४८ कोटी लाभार्थ्यांसाठी २६,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा योजनेच्या बजेटमध्ये सुमारे १९ हजार कोटी रुपयांची कपात करण्यात आली. सुरुवातीला कमी कागदपत्रांच्या आधारे मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले आणि त्यांना काही महिने लाभही मिळाला. मात्र, डिसेंबर २०२४ पासून पात्रतेची सविस्तर तपासणी सुरू करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government Deems 1 Crore Women Ineligible for 'Ladki Bahin' Scheme

Web Summary : Sharad Pawar's party criticizes Maharashtra government for disqualifying 1 crore women from 'Ladki Bahin' scheme after initial payouts before elections. Rohini Khadse alleges betrayal, pointing to budget cuts despite women empowerment talks.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाRohini Khadseरोहिणी खडसेMahayutiमहायुती