शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Mahayuti vs MVA: देवेंद्र फडणवीसांचं 'होम पीच' असलेल्या नागपुरातील 6 मतदारसंघात गणित कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:27 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नागपूरमधील सहा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढतत होत असली, तर काही फॅक्टर निर्णायक ठरणार आहेत.

कमलेश वानखेडे,नागपूर Maharashtra Election 2024 Vidarbha : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यात भाजपची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'होम पीच' असलेल्या नागपुरात भाजपने सर्व सहाही जागा जिंकून २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे, तर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचाही 'जोश हाय' असून, २०१९ मधील दोन चे चार करू, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. भाजपकडून शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला जात आहे, तर काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर शहरातील सहाही जागांचा विचार करता थेट भाजपमधून मोठी बंडखोरी झालेली नाही, तर तब्बल चार मतदारसंघांत काँग्रेसच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत. 

आभा पांडेंच्या बंडखोरीचा फटका बसण्याची भीती

पूर्व नागपूरची जागा यावेळी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे गेली. शरद पवार यांच्या पसंतीचे उमेदवार असलेले दुनेश्वर पेठे यांचा सामना भाजपचे हेविवेट उमेदवार कृष्णा खोपडे यांच्याशी आहे. पण, येथे अजित पवार गटाच्या आभा पांडे यांच्या बंडखोरीमुळे भाजपला काहीसे नुकसान होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे गेल्यावेळचे तेली समाजाचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनीही बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला बसेल की शरद पवार गटाला याचे मोजमाप सुरू आहे.

नागपूर दक्षिण मतदारसंघात काय?

दक्षिण नागपुरात २०१९ प्रमाणेच भाजपचे मोहन मते व काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात थेट सामना आहे. मते हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत जीवलग आहेत, तर गिरीश पांडव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भातील राईट हॅण्ड समजले जाणारे किरण पांडव यांचे बंधू, त्यामुळे या लढतीत अनेक वाटा व वळणे आहेत. 

नागपूर पश्चिममध्ये ठाकरे विरुद्ध कोहळे

लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी यांना भिडणारे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे पुन्हा एकदा पश्चिम नागपुरात नशीब आजमावत आहेत. भाजपमध्ये उमेदवारीवरून बरेच मंथन झाले. हिंदी भाषिकांचा दावा मोडीत काढत ऐनवेळी नितीन गडकरी यांचे विश्वासू असलेले दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पश्चिममध्ये उतरविण्यात आले.

सुरुवातीच्या नाराजीनंतर आता ठाकरेंना घेरण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेसमधून निलंबित झालेले नरेंद्र जिचकार अपक्ष रिंगणात आहेत. ते भाजप नेत्यांचे 'लाडका भाऊ' बनले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने येथे पक्षाचे अखिल भारतीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांना पुन्हा संधी दिली आहे. २०१४ मध्ये गुडधे यांच्या विरोधात एकतर्फी सामना जिंकला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने ३५ हजारांवर मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुडधे ही आघाडी भरून काढतात की फडणवीस एकतर्फी विजयाची पुनरावृत्ती करतात याकडे लक्ष लागले आहे.

मध्य नागपुरात 'हलबा'चा फटका कुणाला ?

मध्य नागपूरमध्ये हलबा समाजाचे प्राबल्य आहे. येथे भाजपने हलबा समाजाचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापून आ. प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने गेल्यावेळी पराभूत झालेले बंटी शेळके यांच्यावरच डाव खेळला आहे. हलबा समाजाने एकत्र येत काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. पुणेकर हे भाजपकडे जाणारे हलबा व काँग्रेस अशी दोघांचीही मते खेचत आहेत. त्यामुळे येथे गेल्यावेळेप्रमाणेच अटीतटीची लढत होईल, असे दिसते.

निवडणुकीतील महत्त्वाचे फॅक्टर 

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दारोमदार वंचितच्या कॅडर मतांवर अवलंबून आहे. मध्य नागपुरात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. येथे चार मुस्लीम उमेदवार अपक्ष म्हणून लढत आहेत. 

मुस्लीम मतविभाजन मोठ्या प्रमाणात झाले तर काँग्रेसच्या अडचणी वाढतील. उत्तर नागपुरात काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सांगोळे हे पक्षांतर करीत बसपाच्या हत्तीवर स्वार झाले आहेत. येथे हत्ती जोरात धावला तर काँग्रेसला धाप लागू शकते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस