शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वीज खरेदी घोटाळ्याची होणार चौकशी; ऊर्जा मंत्री राऊत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:27 IST

निवृत्त संचालकाचा भ्रष्टाचारात समावेश

मुंबई : महावितरणचे निवृत्त संचालक (संचालन) दिनेश साबू यांनी ३,५०० कोटी रुपयांचा वीज खरेदी घोटाळा करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपांची त्रयस्थ अधिकाऱ्यांद्वारे चौकशी केली जाईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी विधानसभेत केली.महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित केल्यानंतर लगेच माजी संचालक (संचलन) यांच्यावरील आरोपांची चौकशी जाहीर केल्याने ऊर्जा विभागात खळबळ माजली आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यामार्फत साबू यांच्यावरील आरोपांची मुद्देनिहाय चौकशी करण्यात येईल, असे राऊत यांनी लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात सांगितले.  त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार निलंबितमहावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) तथा मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार यांच्या कार्यपद्धती आणि वर्तणुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत, त्यांना निलंबित करण्याची घोषणा ऊर्जा मंत्री राऊत यांनी केली. लक्षवेधी सूचनेवर उत्तरात त्यांनी सांगितले की, सुमित कुमार हे पूर्वी केंद्र सरकारमध्ये नोकरीला होते. ते सरळसेवेने महावितरणमध्ये उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) पदावर रुजू झाले. तक्रारींमुळे त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली होती. आता ते कोकण प्रादेशिक कार्यालयात कार्यरत आहेत.कठोर कारवाई करण्याची विधानसभेत मागणी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार आणि दिनेश साबू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत लक्षवेधी मांडली होती. त्यावरील चर्चेत आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, प्रकाश सुर्वे, अशोक उईके यांनी भाग घेतला. साबू यांची चौकशी होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. साबू यांच्यावरील आरोपांची तातडीने चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या सर्व सदस्यांनी केली.आर्थिक गुन्हे शाखेला सादर करणार अहवाल खंदारे यांचा अहवाल आल्यानंतर तो शासनाला पाठविला जाईल आणि पुढील कारवाईसाठी हा अहवाल आर्थिक गुन्हे शाखा व विशेष शाखा यांना सादर करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.साबू यांचे घोटाळेवीज खरेदीत ३५०० कोटी रुपयांचा घोटाळा.शेतकऱ्यांच्या वीज बिलातील घोटाळाटोरंटो पॉवर भूखंड घोटाळाबिल्डरांच्या अनुचित फायद्यासाठी नियमात बदल.विजेची खरेदी दिनेश साबू यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे डॉ. राऊत यांनी मान्य केले. साबूंविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आले आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत