शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

पैसे संपले... होईल बत्ती गुल, रिचार्ज करा, मगच येईल वीज! महावितरण स्मार्ट होतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:25 IST

जुने वीज मीटर हटणार आणि प्रीपेड स्मार्ट मीटर लागणार : अदानीसह चार कंपन्यांना काम, २७ महिन्यांत बदलावे लागणार मीटर

- कमल शर्मा  लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाइलप्रमाणे आता वीज सेवासुद्धा प्रीपेड व पोस्टपेड होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटवून स्मार्ट मीटर लावले जातील. यात प्रीपेड मीटरमध्ये पैसे संपले की वीज पुरवठा खंडित केला जाईल. रिचार्ज केल्यावर परत वीज सेवा सुरळीत होईल.

महावितरणने यासाठी २६ कोटी रुपयांच्या ६ निविदा वितरित केल्या असून अदानी पॉवरसह चार कंपन्यांना एलओए (लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स) अर्थात स्वीकारपत्र जारी करण्यात आले आहे. आता या कंपन्यांना एकूण २७ महिन्यांत राज्यभरातील २.३७ कोटी ग्राहकांचे मीटर बदलवून प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागतील. येत्या १० वर्षांपर्यंत मीटरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच कंपन्यांची राहील. 

एकूण सात निविदा जारी करण्यात आल्या होत्या. परंतु, केवळ ११०० कोटी रुपयांची कोल्हापूरसाठी जारी निविदा वितरित होऊ शकली नाही. सर्वाधिक काम अदानी समूहाला मिळाले आहे, असे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

सिक्युरिटी डिपॉझिटचे काय? महावितरण सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावावर एक महिन्याच्या बिलाचे पैसे आपल्याकडे ठेवते. परंतु प्रीपेड मीटर आल्यानंतर कंपनीकडे बिलाचे पैसे अगोदरच येतील. आता प्रश्न असा निर्माण होतो की, स्मार्ट मीटर लागल्यानंतर ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिट परत केले जाईल की नाही.

विजेची हानी व चोरी रोखण्यासाठी महावितरण राज्यभरात २७ हजार फीडर व चार लाख ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा स्मार्ट मीटर लावण्यात येतील. तसे फीडरमध्ये अगोदरपासूनच मीटर लागलेले आहेत. परंतु चीप नसल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही आहे.

चार महिन्यांमध्ये घराेघरी मीटर बदलण्याचे काम हाेणार सुरुn वीज वितरण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेले महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना याची माहिती दिली. n त्यांनी सांगितले की, येत्या चार महिन्यात मीटर बदलण्याच्या कामाला सुरुवात होईल. परंतु नवीन कनेक्शनसाठी पुढच्या महिन्यापासूनच स्मार्ट मीटर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. n मोबाइलप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड व प्रीपेड असतील. हे मीटर लागल्यानंतर थकबाकीची समस्या पूर्णपणे दूर होईल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज