महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:46 IST2020-09-13T00:58:48+5:302020-09-13T06:46:08+5:30
पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण मान्य नव्हते.

महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप
पिंपरी (पुणे) : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी १५ वर्षांच्या सत्ताकाळात आरक्षण दिले नाही. मागासवर्गीय आयोगाने २७ पानांचा अहवाल दिला होता. या अहवालाआधारे उच्च न्यायालयाने आरक्षणाला मान्यता दिली. मात्र, आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडू शकले नाहीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम न केल्यास बदली करण्याचा इशारा दिला होता. याविषयी पाटील म्हणाले, ‘ केवळ धाकधपटशाही व आरडाओरडा करून माणसं कामं करीत नाहीत.’
वाद बंद खोलीत सोडवू
एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे टीका करीत आहेत. परंतु, जिवंत माणसांच्या संघटनेत वाद होतात. संघटनेतील वाद बंद खोलीत संपवायचे असतात.