शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:32 IST

हरयाणातील निवडणूक निकालाने काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे. 

Haryana Election Result ( Marathi News ) : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व एक्झिट पोल्स आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज मोडीत काढत बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. मागील १० वर्षांपासून सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेला असंतोष, शेतकऱ्यांची नाराजी, महिला पैलवानांचे आंदोलन या पार्श्वभूमीवर भाजपला हरयाणाची निवडणूक जिंकणं कठीण जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज प्रत्यक्ष निकालात भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ९० जागांच्या हरयाणा विधानसभेत आताच्या स्थितीत ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. हरयाणातील या निकालामुळे तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झालीच आहे, मात्र त्यासोबतच काही दिवसांतच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखीही वाढवली आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधकांच्या महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत ४८ पैकी तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता हरयाणा विधानसभेतही जवळपास सर्वच एक्झिट पोल्सने काँग्रेसला यश मिळेल, असा अंदाज वर्तवल्याने महाराष्ट्रातील काँग्रेससह मविआतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र आज हरयाणा विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि हळहळू काँग्रेसच्या जागांचा आकडा कमी झाला. या निकालाचे परिणाम हरयाणासह महाराष्ट्राच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.

हरयाणातील कोणते चार मुद्दे महाराष्ट्रात मविआसाठी ठरू शकतात डोकेदुखी?

१. विपरीत स्थितीतही भाजपने यश मिळवलं

हरयाणा विधानसभा निवडणुकीची परीक्षा भाजपसाठी खडतर ठरणारी होती. कारण मागील १० वर्षांपासून राज्यात सत्तेत असल्यामुळे समाजातील विविध स्तरांतील लोकांमध्ये सरकारप्रती असंतोष निर्माण झाला होता. हीच बाब हेरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सहा महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री बदलत नायब सिंह सैनी यांच्यावर मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी सोपवली. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरयाणातील १० पैकी पाच जागा मिळवत काँग्रेसने भाजपला चांगली झुंज दिली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस वरचढ ठरणार, असं चित्र  निर्माण झालं होतं. परंतु या विपरीत स्थितीतही अचूक निवडणूक नियोजन करत भाजपने यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्रातही सध्या भाजपप्रणित महायुतीसाठी फारसं अनुकूल वातावरण नाही. लोकसभा निवडणूक निकालातून याची प्रचिती आली होती. मात्र भाजपने मागील काही वर्षांत खडतर स्थितीतही काही अनोखे डावपेच आखत सत्ता मिळवण्याचं तंत्र विकसित केलं असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लढाई महाविकास आघाडीसाठी सोपी असणार नाही, हे हरयाणा निवडणूक निकालातून स्पष्ट झालं आहे.

२. शेतकरी आणि इतर घटकांच्या असंतोषाचा फायदा काँग्रेसला उचलता आला नाही!

हरयाणात मागील काही वर्षांपासून समाजातील विविध घटकांनी सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यामध्ये शेतकऱ्यांसह महिला खेळाडूंवरील अन्याय आणि इतर काही बाबींचा समावेश होता. महाराष्ट्रातही कांदा, सोयाबीन अशा पिकांचे भाव आणि दुधाच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद आहे. तसंच दुसरीकडे मराठा, ओबीसी, धनगर आणि आदिवासी समाजात आरक्षण प्रश्नावरून अस्वस्थता आहे. मात्र समाजातील अस्वस्थतेला आवाज देण्यात हरयाणात काँग्रेस अपयशी ठरली असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश येणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

३. अतिआत्मविश्वास नडला!

हरयाणात आम्ही कोणत्याही स्थितीत बहुमताचा जादुई आकडा गाठू, असा ठाम विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. काही नेत्यांनी तर आम्हाला ९० पैकी ७० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांचा हा अतिआत्मविश्वास पक्षासाठी घातक ठरला. महाराष्ट्रातही मविआतील तीनही पक्षांकडून वेगवेगळे आकडे सांगत बहुमत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र लोकसभा निवडणूक निकालाच्या आधारे केले जाणारे हे दावे विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात उतरवायचे असतील तर जागावाटपाचं गणित नीटपणे सोडवून नंतर योग्य उमेदवार दिले, तरंच सत्ताधारी महायुतीचा सामना करणं महाविकास आघाडीला शक्य होणार आहे.

४. मुख्यमंत्रि‍पदावरून मतभेद!

हरयाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसत असल्याने पक्षात मुख्यमंत्रि‍पदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. या स्पर्धेतूनच काही नेत्यांकडून स्वपक्षातील नेत्यांवरच जाहीरपणे टीकेचे बाणही चालवले जात होते. महाराष्ट्रातही मविआत मुख्यमंत्रि‍पदावरून होणारा संघर्ष लपून राहिलेला नाही. मविआतील तीनही प्रमुख पक्षांकडून मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला जात असून ही अंतर्गत स्पर्धा महाराष्ट्रातही मविआचा घात करू शकते.

दरम्यान, हरयाणा विधानसभेचा निकाल काँग्रेस आणि मविआसाठी निराजाशानजक ठरला असला तरी महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी हुरळून जाण्यासारखी स्थितीही राज्यात दिसत नाही. कारण शेतकऱ्यांसह आरक्षण प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात सत्ताधाऱ्यांना अद्याप यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर होत असलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार, हे मात्र निश्चित. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती