महाड दुर्घटना : १० दिवसांनी सापडली वाहून गेलेली दुसरी एसटी
By Admin | Updated: August 13, 2016 12:33 IST2016-08-13T11:29:17+5:302016-08-13T12:33:25+5:30
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी बस व काही छोट्या गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यापैकी दुस-या बसचाही अखेर शोध लागला आहे.

महाड दुर्घटना : १० दिवसांनी सापडली वाहून गेलेली दुसरी एसटी
>ऑनलाइन लोकमत
महाड, दि. १३ - महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी बस व काही छोट्या गाड्या वाहून गेल्या होत्या. त्यापैकी दुस-या बसचाही अखेर शोध लागला असून पूलासापून ५०० मीटर अंतरावर नौदलाच्या जवानांना ही बस सापडली आहे. दोन दिवसांपूर्वीच या दुर्घटनेतील राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर सापडली होती. तर आज दुस-या जयगड- मुंबई या दुस-या एसटीचाही शोध लागला असून त्यामध्ये कोणतेही मृतदेह सापडलेले नसल्याची माहिती नौदलाच्या अधिका-यांनी दिली. ही बस नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येत असून त्यासाठी सुमारे ५ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नौदलाच्या जवानांचे नदीपात्रात शोधकार्य सुरू होते. गुरूवारी नौदलाच्या पाणबुड्यांनी सलग तीन तास पाण्याखाली सर्च ऑपरेशन असता त्यांना एकाच एसटीचा सांगाडा सापडला. अखेर आज दुसरी एसटीही सापडली आहे.
२ ऑगस्टच्या रात्री रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून दोन बस व काही गाड्या वाहून गेल्या. या दुर्घटनेत ४० हून अधकि नागरिक मृत्यूमुखी पडले असून २८ जणांचे मृतदेह सापडले आहेत.