शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra ZP Election Results 2021: स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:01 IST

जि.प. पोटनिवडणूक निकाल; ओबीसीच्या जागा किंचित घटल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सहा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.

मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८५; तर त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४४ रिक्तपदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तथापि, भाजपच्या जागा मात्र घटल्याचे निकालावरून दिसते. नागपूर जि. प.मध्ये ओबीसींची १ जागा तर पंचायत समितीत १२ जागा कमी झाल्या आहेत. नंदुरबार जि. प.मध्ये ३ तर धुळे पंचायत समितीत ओबीसींची १ जागा कमी झाली.

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी स्वतंत्र लढूनही मिळविलेल्या जागांची बेरीज केल्यास भाजपहून दुप्पट जागा पटकावल्याचे दिसते. यामुळे ग्रामीण झुकते माप दिल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सहा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर पोटनिवडणुकीचे मंगळवारी मतदान होऊन बुधवारी मतमोजणी झाली. महाविकास आघाडीतील तीन पैकी दोन पक्ष एकत्र लढले किंवा तिघेही वेगवेगळे लढले, असे बहुतेक ठिकाणचे चित्र होते. अत्यंत अपवादात्मक ठिकाणीच तिघे एकत्र होते. धुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या.

पालघरमध्ये शिवसेना-भाजपचा फायदापालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपले सदस्य संख्याबळ दोनने वाढवीत पाच गटात विजय संपादन केला, तर भाजपने आपले संख्याबळ चारवरून पाच केले आहे. सीपीएमने आपला उधवा गट शाबूत ठेवला असताना राष्ट्रवादी पक्षाला मात्र सातपैकी दोन जागा गमवाव्या लागल्या. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत १५ जागांसाठी ७४ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० असे एकूण १४४ उमेदवार रिंगणात होते.

तलासरी तालुक्यातील उधवा गटात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अक्षय दवणेकर (४,९९७) यांनी भाजपच्या नरहरी निकुंभ (४,३७५) यांचा पराभव केला आहे. डहाणू तालुक्यातील चार गटांपैकी बोर्डी गटात भाजपच्या ज्योती पाटील (५,२८३) यांनी राष्ट्रवादीच्या उन्नती राऊत (४,८६७) यांचा पराभव केला. कासा गटात राष्ट्रवादीच्या लतिका बालशी (५,३१२) यांनी शिवसेनेच्या सुनीता कामडी (२,७२५) यांचा पराभव केला. सरावली गटात भाजपच्या सुनील माच्छी (४,१११) यांनी सीपीएमच्या रडका कलंगडा (३,६१६) यांचा पराभव केला. वणई गटात भाजपच्या पंकज कोरे (३,६५४) यांनी काँग्रेसच्या वर्षा वायडा (३,२४२) यांचा पराभव केला. शिवसेना उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गटात भाजपच्या संदीप पावडे (४,१५३) यांनी राष्ट्रवादीच्या विपुल पाटील (३,३५१) यांचा ८०२ मतांनी पराभव केला. मोखाडा तालुक्यातील आसे गटात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष हबीब शेख (५,६७५) यांनी भाजपच्या शिवा निसाळ (४,०१४) यांचा पराभव केला. पोशेरा गटात शिवसेनेच्या सारिका निकम (४,३१३) यांनी भाजपच्या किशोरी गाटे (३,९८६) यांचा पराभव केला.वाडा तालुक्यातील गारगाव गटात राष्ट्रवादीच्या रोहिणी शेलार (६,७५५) यांनी शिवसेनेच्या नीलम पाटील (४,९१३) यांचा पराभव केला. मोज गटात सेनेच्या अरुण ठाकरे (५,४९५) यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद देशमुख (३,४३१) यांचा पराभव केला. मांडा गटात राष्ट्रवादीच्या अक्षता चौधरी (४,११४) यांनी भाजपच्या राजेंद्र कुमार पाटील (३,७६८) यांचा पराभव केला. पालसई गटात शिवसेनेच्या मिताली बागुल (५,३२९) यांनी भाजपच्या धनश्री चौधरी (४,०३८) यांचा पराभव केला. आबिटघर गटात राष्ट्रवादीच्या भक्ती वलटे (३,६७९) यांनी निसटत्या मताने भाजपच्या मेघना पाटील (३,६५८) यांच्यावर अवघ्या २१ मताने विजय मिळविला. पालघर तालुक्यातील सावरे-एम्बूर गटात शिवसेनेच्या विनया पाटील (६,५७६) यांनी बहुजन विकास आघाडीच्या प्रांजल पाटील (२,९४१) यांचा पराभव केला. नंडोरे-देवखोप या गटात मागच्या पराभवाचे उट्टे काढीत शिवसेनेच्या नीता पाटील (४,०७२) यांनी राष्ट्रवादीच्या कविता खटाळी (३,२०५) यांचा पराभव केला.

पक्षीय बलाबल

जिल्हा परिषदभाजप - २२कॉँग्रेस - १९रा. कॉँ. - १५शिवसेना - १२इतर - १८एकूण - ८५ 

पंचायत समितीभाजप - ३३कॉँग्रेस - ३६रा. कॉँ. - १८शिवसेना - २३मनसे - १इतर - ३३एकूण - १४४

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसZP Electionजिल्हा परिषदBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी