शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ZP Election 2020 : हवा बदल रही है! नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भुजबळांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:06 IST

नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल हा नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. 

मुंबई -  नागपूरजिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झाली असून, काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूरजिल्हा परिषदेच्या निकालांवरून भाजपाला टोला लगावला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालावरून हवा बदलत आहे, असे दिसत आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची सत्ता होती. दरम्यान, नागपूरमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने जोर लावला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीही भाजपाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल पैकी २८ सर्कलचे निकाल जाहीर झाले आहेत. यात २३ जागावर कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसने १९ तर राष्ट्रवादीने चार जागावर विजय मिळविला आहे. भाजप चार जागावर विजयी झाली आहे तर एका जागेवर शेकापला विजय मिळाला आहे.नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. यात कॉँग्रेसने ४२ तर राष्ट्रवादीने १६ जागेवर निवडणूक लढविली होती.

ZP Election 2020; नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेकडे

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत

ZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजयनागपूर जिल्हा परिषदेचा निकाल हा नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बावनकुळेंचे तिकीट कापल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळnagpurनागपूरBJPभाजपाZP Electionजिल्हा परिषदPoliticsराजकारण