शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव?; अधिवेशनात पुन्हा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:23 IST2024-12-17T15:19:13+5:302024-12-17T15:23:07+5:30

या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करा. जे अॅडव्होकेट जनरल शेखर जगताप यांची शासकीय पॅनेलवरून काढून टाका अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

Maharashtra Winter Session 2024- Conspiracy to implicate Devendra Fadnavis Eknath Shinde in false charges during Mahavikas Aghadi government, Pravin Darekar brings pen drive of sting operation | शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव?; अधिवेशनात पुन्हा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'ची चर्चा

शिंदे-फडणवीसांना अडकवण्याचा डाव?; अधिवेशनात पुन्हा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'ची चर्चा

नागपूर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करून अडचणीत आणण्याचा डाव होता असा दावा एका स्टिंगद्वारे करण्यात आला आहे. या स्टिंगमध्ये एसीपी सरदार पाटील एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते परमबीर सिंह आणि संजय पुनामिया यांच्यार गुन्हा दाखल करून फडणवीस-शिंदे यांना अडकवण्याचं षडयंत्र असल्याचं समोर आले आहे.

विधान परिषदेत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने गंभीर घटना टीव्ही माध्यमांत दाखवली गेली. ज्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याचा कट रचला गेला. त्याबाबत झालेले संभाषण व्हिडिओ क्लीप मी पेन ड्राईव्हमधून सभागृहात आणल्या आहेत. संजय पांडे नावाच्या अधिकाऱ्याने डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्लॅन करा असे आदेश दिले होते. हा व्हिडिओ महाराष्ट्राने पाहिले आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच संजय पुनामिया यांनी शेखर जगताप, एसीपी सरदार पाटील आणि काही लोकांविरोधात तक्रार केली. त्यात जो जबाब दिला तो धक्कादायक आहे. तो एसीपी सांगतोय, मला भीती वाटते, गुन्हा होऊ शकत नाही मग कसं अडकवता येईल. तरीही डीसीपी पाटील हे पांडेंचे आदेश आहेत, आपल्याला करावे लागते. कुठल्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना अडकवता येईल त्यादृष्टीने कारवाई करा. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रस्थ वाढत होते. शिवसेनेत त्यांचे वलय वाढत असल्याची भीती काहींना होती. बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती दिल्याने त्यांच्या मनात वैचारिक बंडखोरीची भावना होती असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं.

दरम्यान, एसीपी सरदार पाटील यांच्या स्टिंग ऑपरेशनचे २ व्हिडिओ माझ्याकडे आहेत. त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे टार्गेट होते असं म्हणताना दिसतात. सूडाची भावना ठेवून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्यारितीने सरकारला धारेवर धरत होते त्यांना अडचणीत आणण्याचं स्टिंग ऑपरेशन, जबाब आहेत. सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. मविआ सरकार कसं सूडभावनेने वागत होते ते दिसले. विरोधकांचा खरा चेहरा हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आला पाहिजे. या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करा. जे अॅडव्होकेट जनरल शेखर जगताप यांची शासकीय पॅनेलवरून काढून टाका अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

हे प्रकरण गंभीर, SIT चौकशी करणार 

प्रवीण दरेकर यांनी अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहासमोर आणला. दरेकरांनी जो जबाब वाचून दाखवला, एक कनिष्ठ अधिकारी स्वत:च्या मर्जीने करू शकत नाही. या घटनेमागे कोण सूत्रधार आहे, कुणाच्या सांगण्यावरून हे झाले हे शोधले पाहिजे. हे प्रकरण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत त्यांना पोलीस विभागाशी हाताशी धरून असा प्रयत्न झाला असेल तर सरकार याबाबत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करून तपास केला जाईल. निष्पक्षपणे एसआयटी चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त करून तात्काळ कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात दिली. 

Web Title: Maharashtra Winter Session 2024- Conspiracy to implicate Devendra Fadnavis Eknath Shinde in false charges during Mahavikas Aghadi government, Pravin Darekar brings pen drive of sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.