शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

Maharashtra winter session 2021 :...तुम्ही, हाॅस्पिटल बांधताय की, ताजमहाल? विधान परिषदेतील त्याच त्या उत्तराने सदस्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 6:15 AM

Maharashtra winter session 2021 : ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला.

मुंबई : रखडलेले प्रकल्प, वाढता खर्च आणि शासनाकडून मिळणारी नेहमीची उत्तरे यामुळे मंगळवारी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. ठाणे येथील कौसा रूग्णालयाचे काम पूर्ण होत नसल्याने हॉस्पिटल बांधतात की, ताजमहाल, असा प्रश्न भाजपचे निरंजन डावखरे यांनी केला. तर, दशकानुदशके ज्येष्ठ सदस्यांचे महत्त्वाचे प्रश्न सुटत नसतील तर, सभागृह हवेच कशाला, असा संताप किरण सरनाईक यांनी व्यक्त केला. पहिल्यांदाच आमदार बनलेल्या सरनाईकांच्या संतप्त भाषणामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.

निरंजन डावखरे यांनी कौसा रुग्णालयाची उभारणी तसेच उभारणीच्या कामाला लागलेला विलंबासंबंधी लक्षवेधी मांडली होती. यावर, कौसा रूग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या कामासाठी ५४ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. पावसाळा वगळून २४ महिन्यांची मुदत कंत्राटदाराला दिली होती. 

तसेच या रुग्णालयाच्या ६७.७८ कोटी रूपयांच्या टप्पा दोनच्या प्रस्तावास महापालिकेच्या महासभेने १३ एप्रिल २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. आतापर्यंत या कामासाठी ५६.१३ कोटी रुपये खर्च झाल्याचे तनपुरे यांनी सांगितले. यावर संतप्त होत, हॉस्पिटल बांधताय की, ताजमहाल, असा प्रश्न डावखरे यांनी उपस्थित केला.

उपसभापतींनी दिला सबुरीचा सल्ला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कशीबशी चर्चा पूर्ण केली. नवीन आमदार सभागृहात आल्यावर त्यांना रुळायला वेळ लागतो. अनेकदा सभापती त्यांना बोलायला प्रोत्साहन देत असतात. मंगळवारी मात्र किरण सरनाईक यांना आवरण्याची वेळ आली. सभापतींनी शेवटी त्यांना दालनात बोलावून कामकाजाबाबत सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.

सूचना करूनही सरनाईकांची सरबत्तीराष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक मंगळवारी  प्रथमच बोलायला उभे राहिले होते. सोमवारी सभागृहात ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी निरोपाच्या भाषणात कोकण विकासाचे प्रश्न सोडवता आले नसल्याचे म्हटले होते. तर, आज डावखरे आणि कपिल पाटील यांनी आपापल्या लक्षवेधींचे प्रश्न सुटत नसल्याचे म्हटले. यावर, भावनावेगात सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना वारंवार शांत राहण्याची सूचना केली. मात्र, सरनाईक शांत व्हायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे प्रश्न सुटत नसतील तर, प्रश्न विचारायचे कशाला, सभागृह हवेच कशाला अशी सरबत्ती सरनाईक यांनी केली. 

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेVidhan Parishadविधान परिषद