शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची बाजी; मिळाले सर्वाधिक ९२ पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:34 IST

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे.

मुंबई : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक तब्बल ९२ पुरस्कार पटकावले आहेत. सर्वेक्षणातील ४० टक्के पुरस्कार एकट्या महाराष्ट्राला मिळाले. ६५९ जिल्ह्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेश असून, देशातील प्रमुख १०० स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राज्यातील २३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे.  यातून राज्याची मान देशातच नाही, तर जगातही गौरवाने उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे अभिनंदन करण्यात आले.

स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराचे स्थान यंदा ३५ वरून ३७ व्या स्थानावर घसरले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे. सर्व समावेशक कॅटेगरीत नवी मुंबई शहराची एका स्थानाने घसरण झाली असून, यंदा नवी मुंबई चौथ्या स्थानावर आहे.वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४७ शहरांचा समावेश  आहे. यामध्ये  राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४३ शहरे आहेत, त्यात महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाइव्ह स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना  सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये राज्यातील नवी मुंबईचा समावेश आहे.

शांताबाई झाल्या भावुक गेल्या ३४ वर्षांपासून हातात झाडू घेऊन विटा शहराची सेवा करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी शांताबाई उत्तम हत्तीकर यांना राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर जाण्याचे भाग्य मिळाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रपतींना शांताबाईंची ओळख करून दिली. या सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने शांताबाई भावुक झाल्या होत्या.

६५९ जिल्ह्यांमध्ये राज्यातील ३३ जिल्ह्यांचा समावेशपुणे (१३), धुळे (२०), ठाणे (२१), चंद्रपूर (२४), सातारा (३५), नाशिक (३७), कोल्हापूर (४३), रायगड (४४), सांगली (४७), नागपूर (५०), सोलापूर (५१), परभणी (५६), औरंगाबाद (५९), नगर (६५), हिंगोली (६६), लातूर (६७), अमरावती (७२), जालना (८३), नंदुरबार (९०), नांदेड (९४), रत्नागिरी (९७), पालघर (९८) आणि सिंधुुदुर्ग (९९).

महाराष्ट्राने स्वच्छतेच्या चळवळीत आघाडी ठेवली आहे. लोकसहभाग हा स्वच्छता चळवळीचा आत्मा आहे. स्वच्छतेची ही चळवळ अशीच अव्याहतपणे सुरू राहावी. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने करता येतील ते सर्व प्रयत्न करत राहूया.-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई