शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 12:37 IST

आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.

मुंबई : आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं असून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला विरोध करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावे पार पडत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे काल राज्यातील तिसरा ओबीसी एल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. तसंच जरांगे पाटील यांच्या हिंदीतील संभाषणाचा व्हिडिओ दाखवत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती व्यक्त केली आहे.

"राज्यात आरक्षणाचा विषय अतिशय गंभीर आहे. याकडे सत्ताधारी गटाने आणि विशेषत: मंत्र्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. मराठा-ओबीसी या वादात दोन्हीकडच्या लोकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. असं असताना छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री जरांगे पाटील यांची खिल्ली उडवत मिमिक्री करत असल्याचा एक व्हिडिओ पाहिला. हा प्रकार या राज्याच्या संस्कृतीला अशोभनीय तर आहेच, सोबतच आगीत तेल ओतण्याचा देखील आहे," अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रातील जातीय सलोखा टिकवायचा असेल तर अशा प्रलोभनांपासून दूर राहायला हवं, अन्यथा महाराष्ट्राची वाटचाल देखील मणिपूरच्या दिशेने व्हायला वेळ लागणार नाही, असं आव्हाड म्हणाले.

इंदापूरमधील सभेत नेमकं काय म्हणाले भुजबळ?

इंदापूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांची हिंदीत बोलत असल्याची एक व्हिडिओ क्लिप ऐकवत, त्यांना हिंदी बोलणे जमत नाही, ते अकलेने दिव्यांग झाले आहेत, अशी घणाघाती टीका केली. तसंच ते मला येवल्याचं वेडपट म्हणत आहे. पण जरांगे यांचा जन्म झाला होता का नव्हता, तेव्हा मी महापौर आणि आमदार झालो. तेही दोनदा झालो. जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावे, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण