शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 15:30 IST

Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात 'मी पुन्हा येईन' कविता सादर केली होती. त्यानंतरच्या अनेक सभांमध्येही फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' असं म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी आज अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीए. पाऊस जाताना 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' म्हणतोय. यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असं ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तेचा तिढा केव्हा सुटेल, यावर थेट भाष्य करणं त्यांनी टाळलं. शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण सत्ता स्थापनेचा विचार करणार असू तर आपण निर्घृण आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.मला शेतीतलं फारसं कळत नाही. पण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय अपुरी असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. 'शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या. यातून तो पुढच्या हंगामाची तयारी करू शकेल. शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक बाबींचा फारसा विचार करू नका. बळीराजाला माणुसकीच्या नात्यानं मदत करा आणि मग निकषांच्या फुटपट्ट्या लावा,' असंदेखील ते पुढे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा. यासाठी प्रशासनानं कागदी घोडे नाचवू नयेत, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा