शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:03 IST

Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील; आठवले आशावादी

मुंबई: शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता स्थापनेवरून मोठी चढाओढ सुरू आहे. सत्तेत समान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. तर पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असा पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे दोन पक्षांमध्ये दबावाचं राजकारण सुरू झालं. या पार्श्वभूमीवर रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शिवसेनेची भूमिका रास्त असली, तरी त्यांनी भाजपाच्या आमदारांची संख्यादेखील विचारात घ्यावी, असा अप्रत्यक्ष सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. शिवसेना, भाजपाचं बिनसलं आहे. पण तुम्ही ते जास्त बिनसवू नका, असा चिमटा आठवलेंनी उपस्थित पत्रकारांना काढला. भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. काही अपक्ष आमदारांनीदेखील त्यांना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचे 56 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला जागेच्या प्रमाणात हक्क मिळायला हवा. मात्र अवास्तव मागणी केली तर त्यांची इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही, असं आठवलेंनी म्हटलं. शिवसेना, भाजपाच्या बिघडलेल्या संबंधांवरदेखील आठवलेंनी भाष्य केलं. 'भाजपा, शिवसेनेचं 5 वर्ष फारसं पटलं नाही. मात्र तरीही ते सोबत राहिले. राज्यातल्या जनतेनं महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता 2 दिवसांत सरकार स्थापन करायला हवं. शिवसेनेनं आमच्यासोबत राहिलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सकारात्मक भूमिका घेतील, अशी मला आशा आहे. यासाठी माझी काही मदत लागली, उद्धव ठाकरेंकडे निरोप घेऊन जायचं असेल तर त्यासाठी मी तयार आहे', असं आठवले म्हणाले. भाजपा, शिवसेनेनं दोन पावलं मागे जाऊन लवकर सरकार स्थापन करायला हवं. कारण राज्याला सरकारची आवश्यकता आहे. अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे. काही भागांत अद्याप पावसाचा जोर असल्यानं तिथं पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे तिथल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, असं आठवलेंनी पत्रकारांना सांगितलं. सामनाची भूमिका ही शिवसेनेची भूमिका नाही. शिवसेना, भाजपामधला वाद सामनानं वाढवू नये, अशा शब्दांत आठवलेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना