शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्यानं राज्यात घोडेबाजाराची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम राहिल्यास भाजपाकडून इतर मार्गांचा वापर करून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसं झाल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ शकतो. भाजपाकडून इतर पक्षांचे आमदार फोडले जाऊ शकतात, अशीदखील चर्चा आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटवरून भाष्य केलं आहे. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो!', असं तांबेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे, असंदेखील तांबेंनी पुढे लिहिलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मात्र भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 118 ते 120 च्या घरात पोहोचलं आहे. मात्र तरीही भाजपा बहुमताच्या जवळ जात नाही. शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा न झाल्यास सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी भाजपाला विश्वासदर्शक ठरावा जिंकावा लागेल. यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच पत्रकार परिषदेत याबद्दलचा आरोप केला जात होता. भाजपाकडून आमदारांवर दबाव आणला जात आहे. गुंडगिरीसह अन्य मार्गांचा वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपासारखं राजकारण गुंडांनीदेखील केलं नसेल, अशा कठोर शब्दांत राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. आमदारांच्या फोडोफोडीच्या शक्यतेवर भाष्य करताना सत्यजित तांबेंनी भाजपाचे नेते उदयनराजे भोसलेंच्या पराभवाचा संदर्भ दिला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या उदयनराजेंनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSatyajit Tambeसत्यजित तांबे